उद्या घडणार राष्ट्रीय तायक्वांदो संघटनेचे भविष्य.
स्वतःला राष्ट्रीय तायक्वांदो संघटना समजणारे उद्या गोळा करणार आपला बिस्तारा.
लातूर / संपादकीय गेली अनेक वर्ष तायक्वांदो संघटनेतील वाद संपत नव्हता. सन २००३ नंतर खेळाला आणि खेळाडुला शासन स्तरावरुन भरगोस सुविधा सुरु झाल्या आणि महाराष्ट्रसह देशभरात अनेक संघटनेत अंतर्गत कलह सुरु झाले. एका संघटनेचे तिन ते चार अगदी काही खेळात तर तेरा संघटना राष्ट्रीय स्तरावर सक्रिय झाल्या आणि आम्हीच खरे आहोत असा दावा सुरू झाला त्यात तायक्वांदो संघटना अपवाद राहिली नाही. तायक्वांदो राष्ट्रीय संघटनेत वाद सुरु झाल्यापासून खेळाडूंचे मागील अनेक वर्षांपासून नुकसान सुरू आहे. हा वाद न्यायालयात पोहंचुन त्यावर निर्णय झाला आणि उद्या दि १४ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय तायक्वांदो संघटना एकसंघ होऊन त्याची निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईल आणि राष्ट्रीय तायक्वांदो संघटनेचे आणि खेळाडूंचे भविष्य कळेल.
तायक्वांदो संघटनेचा अनेक मध्यस्थीना घेतला फायदा.
महाराष्ट्र राज्यातील तायक्वांदो संघटनेतही राष्ट्रीय संघटनेच्या विभाजनामुळे फुट पडली त्यासाठी राज्यात निरीक्षक म्हणून आलेल्या इतर राज्याच्या सचिवांनी अक्षरशः लुट केली या लोकांनी बंगले बांधले वातावरणकुलीत घरे केली. विमान प्रवास खुप मोठा लवाजमा झाला. आणि यांनी खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेच्या नावाखाली करोडो रुपयाची लुट केली.
महाराष्ट्र तायक्वांदोची शेतच कुंपण खातय अशी गत.
सध्या महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेवर असलेले सचिवांनी तर हा वाद पाहुन इंडिया तायक्वांदो नावाने नविन राष्ट्रीय संघटना स्थापन केली आणि देशभर कामाला सुरुवात केली. महाराष्ट्रातील वाद आपण सामंजस्याने मिटवु म्हणून अनेक बैठका घेतल्या गेल्या त्यात प्रत्येकाला आशेचे गाजर दाखवले गेले आणि महाराष्ट्रातील सर्व तायक्वांदो प्रशिक्षक संघटक पदाधिकारी एकञ आले आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र नावाने संघटना सक्रिय करण्यात आली आणि इथेही पुन्हा लुट सुरु झाली. हे प्रकरण लुट पर्यंत न थांबता जे या राज्य संघटनेत आहेत त्या सर्वांना डालवुन नविन महाराष्ट्र तायक्वांदो संघटना स्थापन झाली ज्यांना या महाराष्ट्र ऑलम्पिक च्या सचिवावर प्रचंड विश्वास होता त्यांचे हे कृत्य होत.
राष्ट्रीय संघटना ज्या तिन फळित दुभाजली गेली त्यांना खाडकन जाग!
महाराष्ट्रसह संपुर्ण देशात तायक्वांदो खेळाच्या नावावर लुट होत आहे हे पाहून आणि तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया संपणार हे लक्षात आल्यावर पुन्हा तिन फळीत विभाजन झालाल्यांची दिलजमाई झाली आणि देशातील सर्व जिल्हा व राज्य संघटनेचे वाद संपवून पुन्हा उद्या दि १४ नोव्हेंबर रोजी च्या निवडणुकीनंतर तायक्वांदो राष्ट्रीय संघटना सक्रिय होईल आणि खेळाचे व खेळाडूंचे भवितव्य समजेल.
