घरफोडीतील आरोपींकडून ३ लाख ६५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
लातूर दि ०७ नोव्हेंबर २४ ऑक्टोबर रोजी पोलीस ठाणे स्वामी विवेकानंद हद्दीतील आयोध्या कॉलनी येथील एका घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन कपाटात ठेवलेली रोख रक्कम ३ लाख ७५ हजार रुपये चोरून नेले. तक्रारीवरून पोलीस स्टेशन विवेकानंद चौक येथे गुरनं 598/2022 कलम 454, 457,380 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा आढावा घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी निर्देशित करून महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांनी पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पोलीस पथक नेमुन तपासा बाबत सूचना व मार्गदर्शन केले होते.
तपासा दरम्यान पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरून मोठ्या शिताफीने आरोपी अक्षय राम तेलंगे, वय २२ वर्ष राहणार गोपाळ नगर, लातूर., योगेश उर्फ शक्ती अशोक गुरणे, वय २५ वर्ष, राहणार माताजी नगर, लातूर. या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेकडे गुन्ह्या बाबत विचारपूस केले असता, आरोपींनी गुन्हा केल्याची कबुल केले. गुन्ह्यात चोरलेली रोख रक्कम ३ लाख १२ हजार रुपये व चोरी केलेल्या रक्कमेतून खरेदी केलेला १३५०० रू. चा मोबाईल तसेच इतर ठिकाणाहून चोरी केलेले अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे चार मोबाईल आरोपींच्या कबुली वरून गुन्हयात जप्त करण्यात आले आहेत. गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असून सध्या दोन्ही आरोपी ८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मध्ये आहेत. गुन्ह्याचा तपास पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील सपोनि भाऊसाहेब खंदारे हे करीत आहेत.
सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक बावकर व त्यांच्या टीम मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे, पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, पोलीस अमलदार रामचंद्र ढगे, संजय कांबळे, महेश पारडे, अभिमन्यू सोनटक्के,विनोद चलवाड, दयानंद सारुळे , रमेश नामदास , खंडू कलकत्ते , वाजिद चिकले, दीपक बोंदर, तुकाराम भोसले, नारायण शिंदे मुन्ना नलवाड, सायबर सेलचे संतोष देवडे, गणेश साठे यांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा जलद गतीने व कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्याची उकल करून गुन्हा उघडकीस आणून, गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची कामगिरी बजावली आहे.