जिल्हा कार्याध्यक्षपदी सतीश मोरे तर अंबाजोगाई अध्यक्ष पदी नागेश औताडे यांची निवड
अंबाजोगाई प्रतिनिधी दि ०७ मराठी पत्रकार परिषदे विश्वस्त एस एम देशमुख सर यांच्या आदेशाने व डिजिटल मीडिया चे राज्य सदस्य श्री अनिल वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हाध्यक्ष श्री जितेंद्र शिरसाठ यांनी अंबाजोगाई दर्शन न्युज चॅनल चे मुख्य संपादक श्री सतीश मोरे यांची मराठी पत्रकार परिषद डिजिटल मीडिया बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड तर अंबाजोगाई अध्यक्षपदी नागेश औताडे यांची निवड केल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व सदस्यांनी व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
महाराष्ट्रात सर्वप्रथम बीड येथे डिजिटल मीडिया परिषदेची स्थापना करण्यात आली. दरम्यान दिनांक 4 नोव्हेंबर रोजी वडवणी येथे मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या
डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हा स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सरयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य प्रमुख अनिल वाघमारे तसेच डिजिटल मीडिया परिषदेचे बीड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र सिरसाट उपस्थित होते. या बैठकीदरम्यान नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष तसेच जिल्हा कार्यकारिणीतील सदस्यांना एस. एम. देशमुख सर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हा कार्यकारणीवर व तालुका कार्यकारिणीवर पुढील प्रमाणे निवड करण्यात आली आहे मराठी पत्रकार परिषद डिजिटल मीडिया बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी अंबाजोगाई दर्शन न्युज चॅनल चे संपादक श्री सतीश मोरे यांची निवड करण्यात आली.
बीड जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जिल्हा उपाध्यक्ष – विश्वंभर मुळे, प्रतीक कांबळे, संग्राम धनवे, यांची निवड करण्यात आली तर बीड तालुका अध्यक्ष अभिजीत पवार, वडवणी तालुका अध्यक्ष ओमप्रकाश साबळे, आष्टी तालुका अध्यक्ष संदीप जाधव, गेवराई तालुका अध्यक्ष अविनाश इंगावले, केज तालुका अध्यक्ष रामदास तपसे, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष नागेश अवताडे, धारूर तालुका अध्यक्ष गोवर्धन बडे, यांची निवड करण्यात आली निवड झालेल्या सर्व बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त श्री एस एम देशमुख सर डिजिटल मीडिया परिषदेचे राज्यप्रमुख अनिल वाघमारे व बीड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र शिरसाट यांच्यासह मराठी पत्रकार परिषद सुलग्न डिजिटल मिडिया सदस्यांनी अभिनंदन केले आहे.