शेर-ए-हिंद शहीद टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त इकबाल चौकात रक्तदान व अन्नदान.
लातूर दि २१ नोव्हेंबर शेर-ए-हिंद शहीद टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त इकबाल चौकात रक्तदान व अन्नदान वाटप संत गोरोबा सोसायटीचे चेअरमन श्री विकास कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. काल दि २० नोव्हेंबर रोजी लातूर येथे शेर-ए-हिंद शहीद टिपू सुलतान यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील इकबाल चौकात मोठा प्रमाणावर मुस्लिम व हिंदु बांधव जमा होते. शेर विर पराक्रमी राजा शेर-ए-हिंद शहीद टिपू सुलतान यांचा इतिहास आणि शौर्यगाथेची आठवण यावेळी सर्वांना आली.
यावेळी प्रभाग क्रमांक दोन चे नगरसेवक लातूर युवक काँग्रेस अध्यक्ष इमरान सय्यद, मुनावर शेख, जाकीर भाई, सलाम भाई, सचिन सर व सर्व इकबाल चौक येथील मित्र मंडळ उपस्थित होते