डॉ. दिपाली बेले यांची एम. डी. (त्वचारोगतज्ञ) साठी निवड
लातूर दि ३० नोव्हेंबर येथील सायबर सेलचे पोलीस निरीक्षक अशोक बेले व सुप्रसिद्ध लेखिका- कवयित्री छाया बेले यांची कन्या डॉ. दिपाली बेले यांची मध्य प्रदेशातील रिवा येथील शाम शाह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्वचा रोग विषयातील पदव्युत्तर शिक्षण एम. डी. साठी निवड झाली आहे.
डॉ. दिपाली बेले यांचे एम.बी.बी.एस. पदवी पर्यंतचे शिक्षण मिरज जि. सांगली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे झाले असून रिवा सारख्या नामांकित कॉलेज मध्ये मिळालेल्या प्रवेशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
त्यांच्या यशाचे श्रेय त्यांनी आपली आई साहित्यिक छाया बेले ,वडील अशोक बेले, बहीण सोनाली व कुटुंबियांना दिले आहे. समाजातील गरीब व गरजू लोकांपर्यंत सेवा पोहचविण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यासाठी व स्त्रीशिक्षण व सक्षमीकरणासाठी कार्य करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी जिद्द चिकाटीने कष्ट करून हे यश मिळावल्याचे त्यांच्या आईने सांगितले, तसेच त्यांच्या मेहनत, जिद्द व चिकाटीने त्यांना यश मिळाले आहे असे त्या म्हणाल्या. भावी वाटचालीसाठी सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.