साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे आता साहित्यरत्न लोकशाहिर डाॅ अण्णाभाऊ साठे.
संभाजी नगर : दिड दिवसाची शाळा शिकणारा अवलिया अण्णाभाऊंनी ३७ ग्रंथ १९ कथा १४ लोकसाहित्य ११ पोवाडे ०३ नाटक १०० पेक्षा जास्त वास्तव मांडणारे गाणे लिहिले आणि ते आजही तेवढेच लोकप्रिय आहेत. शालेय अभ्यासक्रमात व विद्यापीठातील अभ्यासक्रमात त्या मोठ्या प्रमाणावर पहायला मिळतात. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु रशियात पोहंचण्याअगोदर अण्णाभाऊ चे साहित्य पोहंचते ज्या साहित्यात वास्तविक वर्णन आणि विज्ञानवाद होता त्या साहित्याला येथील वर्णवादाने दाबुन टाकले. रशियाच्या अभ्यासक्रमात अण्णाभाऊ चे साहित्य अभ्यासले जात आहे. तेथे त्यांचा पुतळा उभा राहतो माञ भारत देशात त्याची दखल घेतली जात नाही आणि दखल घेणासाठी भाग पाडायला येथील समाज तितका सक्षम नाही. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराची मागणी समाजाची असताना ति मागणी बेदखल केली जाते आहे. अश्या परिस्थितीत संभाजी नगरच्या एम जी एम विद्यापीठाने अण्णाभाऊंची दखल घेत त्यांना डि लीट Doctor Of Literature [D.Litt.] हि पदवी नुकतीच प्रदान करुन त्यांचा सन्मान केला गेला आहे. तो स्वीकारण्यासाठी अण्णाभाऊंच्या सुन सावित्रीबाई साठे व नातु सचिन साठे उपस्थित होते. या पदवीचे कौतुक सर्वञ होत आहे. पण येथील समाजाने देशातील न्याय व्यवस्थेला साहित्यरत्न लोकशाहीर डाॅक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळवून देण्यासाठी मोठा लढा उभारणे गरजेचे झाले आहे.
साहित्यरत्न लोकशाहिर डाॅक्टर अण्णाभाऊ साठे यांना प्रदान करण्यात आलेल्या या पदवीबद्दल लातूर नेता न्युज च्या वतिने खुप खुप शुभेच्छा.