वारणेत होणार आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान; भारत आणि इराण च्या मल्लांची होणार लढत.
वारणा मुक्कामी तीन वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर होणार एक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान जवळपास जोडुन तयार आहे.
कोल्हापुर : पन्हाळा तालुक्यातील वारणा नगरीत सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त १३ डिसेंबर २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदान होणार आहे. कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रातील टॉपचे कुस्ती मैदान असणारे वारणेचे मैदान झालेले नाही, पण चालू वर्षी कुस्ती शौकिनांना वारणेच्या मैदानाचे साक्षीदार बनण्याची संधी मिळणार आहे. चाळीस हजार लोकांची बसण्याची क्षमता असणारे वारणेच्या कॉलेज चे भव्य पटांगण चालू वर्षी महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील पैलवान, वस्ताद, आणि कुस्ती शौकिनांनी माखून जाणार आहे. खर्या अर्थाने गेली अनेक वर्षे वारणा नगरीत खूप मोठे कुस्ती मैदान घेण्याची परंपरा विद्यमान आमदार विनयरावजी कोरे साहेब यांनी जपली आहे. खासकरुन महाराष्ट्रात पहिल्यांदा वारणा नगरीत देश विदेशातील पैलवान आणून लढवण्याची किमया आमदार विनयरावजी कोरे साहेब यांनी केली आहे किंबहुना ते आजपर्यंत करत आले आहेत.

वारणा नगरीत एक अध्ययावत सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे कुस्ती केंद्र आहे, त्याठिकाणी कुस्ती कोच ऑल इंडिया चॅम्पियन पै संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवा मल्ल घडत आहेत. शिवाय संदीप सरांच्या माध्यमातून १३ डिसेंबर चे मैदान जवळपास जोडुन तयार झाले आहे. चालु वर्षी या वारणेच्या मैदानात महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी, महान भारत केसरी शिवाय महाराष्ट्राबाहेरील व विदेशातील पैलवान वारणेच्या मैदानात लढणार असल्याची माहिती वारणा उद्योग समूहाचे संस्थापक, आमदार विनयरावजी कोरे साहेब, कुस्ती कोच ऑल इंडिया चॅम्पियन पै संदीप पाटील सर व वारणा उद्योग समुहाकडुन ‘कुस्ती हेच जीवन’ शी स्पष्ट केली आहे. वारणा नगरीत महाराष्ट्रासह इतर राज्यातील सुद्धा कुस्ती शौकिन या कुस्ती मैदान मधील याची देही याची डोळा चित्तथरारक लढती पाहण्यासाठी येत असतो. कुस्ती आरामात दिसावी म्हणून कुस्ती शौकिनांना गॅलरी बांधण्यात येते. चालु वर्षी या वारणेच्या मैदानात भारतातील टॉपच्या मल्लांच्या १४ ते १५ लढती आहेत. जवळपास अडीचशे ते तीनशे काटा जोड लढती त्याठिकाणी पहायला मिळणार आहेत. दोनच दिवसात कुस्ती मैदानची जाहिरात येणार असल्याची माहिती सुद्धा वारणा उद्योग समुहाकडुन समजली आहे.
चला तर मग १३ डिसेंबर ला वारणेच्या मैदानाचे साक्षीदार बनुया आणि याची देही याची डोळा चित्तथरारक लढती अनुभवुया.
लेखन : पै अशोक सावंत पाटील शाहुवाडी
अध्यक्ष कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य मो 9702984006
