जिल्हास्तर शालेय कबड्डी स्पर्धेला १२९ संघाचा सहभाग.
जिल्हा क्रीडा अधिकारी श्री जगन्नाथ लकडे यांच्या हस्ते उद्घाटन.
लातुर दिनांक २८ नोव्हेंबर क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे शालेय कबड्डी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा अंतर्गत स्वामी विवेकानंद विद्यालय लातूर व जिल्हा क्रीडा कार्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर महानगरपालिका क्षेत्रातील शाळा कॉलेजेस साठी होत असलेल्या 14 वर्ष, 17 वर्ष, 19 वर्ष वयोगटातील मुलांच्या आणि मुलींच्या कबड्डी स्पर्धा चे आयोजन दिनांक 28 व 29 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात आलेले आहे. या स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी मा.श्री.जगन्नाथ लकडे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक गोविंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

लातूर महानगरपालिका क्षेत्रातील मुलांच्या 78 संघाने तर मुलीच्या 48 संघाने यामध्ये सहभाग घेतलेला आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये जवळपास 1300 विद्यार्थ्यांसोबत क्रीडा मार्गदर्शक, पंच व शिक्षक जिल्हा क्रीडा विभागातील तालुका क्रीडा अधिकारी श्री.चंद्रकांत लोदगेकर, श्री.सुरेंद्र कराड, प्राचार्य राजकुमार साखरे, प्राचार्य मनोज गायकवाड, प्राचार्य संदीप पांचाळ, मुख्याध्यापक शिवाजी सूर्यवंशी यांच्या सह, क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेएसपीएम शिक्षण संस्थेच्या वतीने क्रीडा स्पर्धांसाठी मैदान, त्यासाठी लागणारे भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल क्रीडा अधिकारी श्री.जगन्नाथ लकडे यांनी संस्थेचे आभार मानले. तर प्राचार्य गोविंद शिंदे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन क्रीडा स्पर्धांना सुरुवात केली.
