क्रीडा संकुलात हाणामारी चोरीचे प्रमाण वाढले; पोलीस प्रशासनाने लक्ष घालायची गरज.
लातूर दि ०२ डिसेंबर जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे हाणामारी व चोरीचे प्रमाण वाढले असुन भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे. संकुलातील भरगच्च गर्दीच्या ठिकाणी हे प्रकार घडत आहेत. सध्या थंडी वाढली असुन सकाळी आणि सायंकाळी क्रीडा संकुलात प्रचंड गर्दी वाढत आहे. याचाच फायदा घेत मोटारसायकल चोरी जास्त होत आहे. काल सायंकाळी तर कहरच झाला. शैक्षणिक पॅटर्न असलेल्या लातूरात शिकवणीसाठी आलेल्या शाळकरी विद्यार्थी क्रीडा संकुलात फेरफटका मारत असताना त्याला चारपाच जणांनी विनाकारण गाठून मारहाण केली. तो पळत गर्दी च्या ठिकाणी आला पण त्यातल्या एकाने या विद्यार्थ्याच्या हातातील अंगठी ओढुन पांढऱ्या रंगाच्या अक्टीवावरुन पळ काढला आहे.

गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्यामुळे येथे येणाऱ्या वृद्धांमधे दहशत पसरली आहे. येथे अगदी पाच सहा वर्षांपासुनचे लहान खेळाडु, महिला, वृद्ध काही आजाराने ग्रस्त असलेली मंडळी असते. अश्या घटनेमुळे सर्वजण ञस्त झाले आहेत. जिल्हा क्रीडा संकुलात बसुन दारु पिणारे, आंबट शौकिन बिनधास्त मौजमजा करताना दिसतात ज्या भागात लाईट बंद पडली आहे तेथे जोडप्यांना प्रायवेसी भेटत आहे. त्यामुळे यांच्यासाठी कस अलबेल झाल आहे पण नागरिक प्रचंड वैतागले आहेत.

दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी श्री जगन्नाथ लकडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी संकुलात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करणार असुन पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे या गर्दीच्या दरम्यान पोलीसांनी गस्त घालावी. तसेच जुने सर्व सिसिटीव्ही कॅमेरे बदलून अद्ययावत करण्यात येत आहे आणि अद्ययावत केलेले सर्व कॅमेरे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाशी कनेक्ट करण्यात येत आहेत. दरम्यान क्रीडा संकुलात चुकीच्या घडणाऱ्या सर्व गोष्टीवर पोलीस प्रशासन बारीक नजर ठेवेल व अश्या घटनेवर आळा बसेल असे लातूर नेता न्युज शी बोलताना स्पष्ट केले आहे.
