लातूरचा झेंडा अटकेपार; थायलंड येथील स्पर्धेत राठोड भगिनींना रौप्य पदक.
धुम धडाक्यात स्वागत; महापुरुषांसह विलासराव देशमुखांना पदक अर्पण.
लातूर दि ०४ डिसेंबर लातूर च्या प्रियंका आणि सुप्रिया राजु राठोड या पाण्यातील बोटींच्या खेळाचा सराव करतात त्यांनी नुकत्याच थायलंड येथे झालेल्या १४ व्या एशियन चॅम्पियनशिप मधे आपली चुनुक दाखवत रौप्य पदावर आपला कब्जा केला असुन त्या ड्रॅगन बोर्ड या प्रकारात 200 व 1000 मिटर स्पर्धेत हि मजल मारली आहे. या दोघी सख्या बहिणी असून त्या गंगाखेड येथील नदी पञात व तलावात सराव करतात. यांच्या विजयाचे सर्वञ कौतुक होत असून त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय प्रशिक्षक व आई वडील यांना दिले आहे. कु प्रियंका आणि सुप्रिया राजु राठोड यांचे आज नुकतेच लातूरात आगमन झाले यावेळी त्यांनी लातूरातील महापुरुषांच्या व स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या पुतळ्यास भेटी देऊन अभिवादन केले आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख असते तर या खेळाडूंचे आणखी कौतुक झाले असते. अश्या खेळाडुंना राजकीय वारसा भेटने गरजेचे आहे.