रात्रीची घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार अटक; लातूर ग्रामीण पोलीसांची कारवाई.
चोरीतील सोने व पैसे असा एकूण 1,90,000 रू चा मुद्देमाल जप्त.
लातूर दि ०५ डिसेंबर पोलीस स्टेशन लातूर ग्रामिण हद्दीतील दि ०९ सप्टेंबर रोजी फिर्यादी नाम गोपाळ किशन मददे वय ५९ वर्ष व्यवसाय शेती राहणार भडी ता जि लातुर यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिलेल्या जबाबावुन तो त्याचे राहते घरी झोपले असता दि.०९ सप्टेंबर रोजी रात्री सव्वादोन वाजता त्याच्या राहत्या घराचे मेन गेटचे कुलुपासह लोखंडी पटी तोडुन आत प्रवेश केले व घरातील किचनरुमचे दाराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करत रुममधील कपाटाचे दार वाकडे केले तसेच आतील लॉकरचे लोक तोडुन आत ठेवलेले सोन्याचे दागीने व नगदी रोख रक्कम असा एकुण 4,89,200/- रुपयाचा माल अनोळखी चोरट्याने चोरुन घेवुन गेला आहे व जातेवेळी कीचनरुमचे तोडलेले कुलुप सोबत घेवुन गेले वगैरे फिर्यादी वरून पो स्टे लातूर ग्रामिण येथे गु.र.न. 191/2022 कलम 457,380, भा. द.वी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हाचे तपासात पोलीस अधिक्षक श्री सोमय्या मुंडे अप्पर पोलीस अधिक्षक श्री अजय देवरे उप विभागीय पोलीस अधिकारी लातूर ग्रामिण श्री सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन लातूर ग्रामिणचे पोलीस निरीक्षक श्री गणेश कदम यांनी सदर गुन्हाचे अणूषंगाणे गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहीती घेवून सदर गुन्हात आरोपी नामे 1) शिवमणी संतोष भोसले वय 21 वर्ष रा. जनवाडी ता भालकी जि. बिदर ह.मु.तरकारी बाजार निलंगा जि लातूर 2) अजय व्यंकट शिंदे वयः 21 वर्ष रा सुगाव ता चाकूर जि.लातूर 3) विजय बबु भोसले वय 21 वर्ष रा.घटशिक रोड वेताळ गल्ली तुळजापूर जि उस्मानाबाद यांना अटक करून त्यांची पोलीस कस्टडी घेवून गुन्हाचे अनुषंगाणे तपास केला असता सदर आरोपीतानी गुन्हा केल्याचे कबूल करून सदर गुन्हातील गेला माला पैकी 50 ग्रॅम सोने व 60 हजार असा एकून 1,90,000 रूपयाचा चोरी गेलेला मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असुन सदरची कारवाई ही मा पोलीस अधिक्षक श्री सोमय्या मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक श्री अजय देवरे, उप विभागीय पोलीस अधिकारी लातूर ग्रामिण श्री सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन लातूर ग्रामिणचे पोलीस निरीक्षक श्री गणेश कदम, सपोनि प्रतिभा ठाकूर तपास अधिकारी पोउपनि तानाजी पाटील: पोहेकॉ 1055 सय्यद मोना 1579 सचिन चंद्रपाटले, पोना 400 राहूल दरोडे पोशी 1698 खंडागळे, दता गिरी, अक्षय डिगोळे, महिला पोलीस अमलदार जाधव चालक हजारे, वाघे यांनी केली आहे.
