भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामुहिक बुद्धवंदनेने अभिवादन.
सामाजिक न्याय विभागाच्या ‘समता पर्व’चाही समारोप
लातूर, दि ०७ डिसेंबर येथील बौद्ध समाजाच्या वतिने सामुहिक बुद्ध वंदनेने भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम डाॅ बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे संपन्न झाला असुन जिल्हा प्रशासन, लोक प्रतिनीधी व मोठ्या संख्येवर बौद्ध बांधव व भगिनी उपस्थित होत्या. तसेच राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने 26 नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिन ते 6 डिसेंबर अर्थात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या कालावधीत ‘समता पर्व’चे आयोजन करण्यात आले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे झालेल्या या कार्यक्रमास समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा समाज कल्याण कल्याण अधिकारी एस. टी. नाईकवाडी, महात्मा बसवेश्वर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक संजय गवई यांनीही यावेळी पुष्पहार अर्पण करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयातर्फे व्यसनमुक्तीबाबत उभारण्यात आलेल्या स्टॉलचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. आणि समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त श्री. देवसटवार यांच्याहस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी व्यसनमुक्ती उपाययोजनांबाबत चर्चा केली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे अभिवादन भारतरत्न डॉ. बाबासाहब आंबेडकर सामजिक न्याय भवन येथे ‘समता पर्व’च्या समारोपीय कार्यक्रमात समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. माजी अतिरिक्त आयुक्त श्री. सास्तुरकर, श्री. डाके, सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, श्री. सकट यांच्यासह समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
