अवैध धंद्यावर धाडीअवैध धंद्यावर धाडी

अवैध धंद्यावर धाडी करत पोलिसांनी केला दोघांसह २१ लाखाचा मुद्देमाल जप्त.

लातूर दि ३१ डिसेंबर या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री. जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलावंडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदारांचे वेगवेगळी पथके तयार करून जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत. त्याप्रमाणे लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याकरिता अवैध धंद्याची माहिती काढत असताना पोलीस पथकास मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून विराट नगर ,खाडगाव रोड परिसरात प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची चोरटी विक्री व्यवसाय होत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहनिशा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी छापा मारून एका व्यक्तीस ताब्यात घेऊन त्यांचे कडून महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले वेगवेगळ्या कंपनीचे,महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटका व सुगंधित पानमसाला व त्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बोलेरो पिकअप वाहन असा एकूण 18 लाख 33 हजार 550 रुपयांचा प्रतिबंधित गुटका व सुगंधित पान मसाला तंबाखू जप्त करण्यात आले आहे.

पोलीस अमलदार अंगद कोतवाड यांचे तक्रारीवरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैद्य साठवणूक करून विक्री व्यवसाय करणारा इसम नामे

1) फिरोज उर्फ आदम आयुब उमाटे वय 30 वर्ष, राहणार विराट नगर, खाडगाव रोड, लातूर.

याचे विरुद्ध पोलीस ठाणे एमआयडीसी येथे

1) गुन्हा रजिस्टर क्रमांक 779/ 2022, कलम 328,188, 272, 273 भा.द.वि. तसेच अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 कलम-59 याप्रमाणे गुन्हा दाखल करून 18 लाख 54 हजार 250 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत.

तसेच उदगीर ग्रामीण हद्दीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून चोरटी विक्री व्यवसाय करणारा इसम

1)राहुल लक्ष्मण कांबळे, वय 29, राहणार लोहारा, तालुका उदगीर जिल्हा लातूर. याला देशी दारूची अवैध वाहतूक करण्यात येत असलेली कारसह ताब्यात घेऊन त्यामधील 53 हजार रुपये किमतीचे 16 बॉक्स देशी दारू कारसह जप्त करून रीतसर गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कार्यवाही करिता उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात, व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वातील पथकामधील पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, माधव बिलापट्टे ,राजेश कंचे, तुराब पठाण, राजाभाऊ मस्के, सचिन मुंडे, बालाजी जाधव, रवी कानगुले यांनी पार पाडली.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!