खेलो इंडिया युथ गेम्स खोखो व राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी बिडच्या शुभम दराडेची निवड.खेलो इंडिया युथ गेम्स खोखो व राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी बिडच्या शुभम दराडेची निवड.

खेलो इंडिया युथ गेम्स खोखो व राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी बिडच्या शुभम दराडेची निवड.

बीड प्रतिनीधी दि ३१ डिसेंबर विभागीय शालेय मैदानी स्पर्धेमध्ये सैनिकी विद्यालयाच्या शुभम शिवाजी दराडे याने २०० मिटर धावण्याच्या शर्यतीत द्वितीय क्रमांक पटकावून राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी तसेच सांगली येथे होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स राज्य खो खो निवड चाचणी स्पर्धेसाठी त्याची निवड झाली असल्याची माहिती सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य श्री डाके एस ए यांनी दिली.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुल येथे विभागीय शालेय मैदानी स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेमध्ये बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली येथील खेळाडूंनी सहभाग नोंदवला. १९ वर्षाखालील वयोगटामध्ये २०० मिटर धावण्याच्या स्पर्धेत सैनिकी विद्यालयाच्या शुभम शिवाजी दराडे याने उत्कृष्ट प्रदर्शन करत द्वितीय स्थान पटकावले. आता पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेमध्ये तो औरंगाबाद विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तसेच मानवत जिल्हा परभणी येथे पार पडलेल्या १९ वर्षाखालील गटाच्या विभागीय शालेय खो-खो स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केल्याबद्दल शुभम दराडे यांची सांगली येथे होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स खो खो निवड चाचणी स्पर्धेसाठी ही औरंगाबाद विभागातून निवड झाली आहे. सैनिकी विद्यालयाच्या खेळाडूंनी यावर्षी शालेय खो-खो, मैदानी, तायक्वांदो, वेटलिप्टींग , कुस्ती, क्रॉस कंट्री अशा अनेक खेळ प्रकारांमध्ये वर्चस्व राखले आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक डॉ.अविनाश बारगजे, डॉ. विनोदचंद्र पवार तसेच सैनिकी निदेशक मेघराज कोल्हे, विजयकुमार धारणकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

शुभम दराडे याच्या दुहेरी यशाबद्दल माजी मंत्री जयदत्तआण्णा क्षीरसागर , संस्थेचे सचिव डॉ. भारतभूषण क्षीरसागर, उपाध्यक्षा डॉ. दीपाताई क्षीरसागर, डॉ. योगेशभैय्या क्षीरसागर यांच्यासह डॉ. राजू मचाले, व्हील एल क्षीरसागर, देशमाने सर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख मॅडम, प्राचार्य श्री डाके एस ए, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा देऊन शुभम दराडे याचे अभिनंदन केले आहे. 

You cannot copy content of this page

error: Content is protected !!