राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी उस्मानाबादच्या 29 खेळाडूंची निवड.
लातूर विभागात उस्मानाबाद तायक्वांदोचा दबदबा कायम.
उस्मानाबाद प्रतिनिधी : लातूर येथे नुकत्याच झालेल्या विभाग स्तरावरून शालेय तायक्वांदो स्पर्धेत उस्मानाबाद च्या 29 वजनीगटात खेळाडूंनी सुवर्णपदकावर आपले नाव कोरत लातुर विभागात उस्मानाबाद तायक्वांदोचा दबदबा कायम ठेवला आहे. या स्पर्धेतून निवड झालेल्या 29 खेळाडूंना अमरावती येथे होणाऱ्या राज्य शालेय तायक्वांदो स्पर्धेत लातूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
दि. 26 व 27 डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल, लातूर येथे झालेल्या या स्पर्धेत उस्मानाबादच्या खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व गाजवून विविध वजनी गटातुन एकूण 29 खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. 14 वर्ष मुले आणि मुलीत
शिवम कांबळे, वरद जामगवकर, यश शेंडगे, पूजा मुंढे, अनुष्का वाघमारे, अंक्षिका सुरवसे, प्राप्ती सोमवंशी 17 वर्ष मुले आणि मुलीमधे नील कासार, ओम कांबळे, समित दसाडे, अभिजित वारे, हर्षवर्धन शिंदे, अर्जुन नागरगोजे, निशा चव्हाण, आर्या बोंदर, अनुश्री राठोड, प्रतीक्षा काळदाते, श्रुती वारे, नूतन ओव्हाळ, सिया सोमाणी, अनुष्का पायाळ, तृप्ती गायकवाड, समृद्धी कराळे तर 19 वर्ष मुले आणि मुलीमधे
दिग्विजय पडवळ, माधव महाजन, समीक्षा मोटे, राधा देशपांडे, तृप्ती सुतार, पवार वैभवी यांची निवड झालो असुन या खेळाडूंना तायक्वांदो प्रशिक्षक राजेश महाजन, राम दराडे, आकाश मोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
विजेत्या खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे, क्रीडा अधिकारी कैलास लटके, जिल्हा तायकवांदो संघटनेचे उपाध्यक्ष जी.बी. कासराळे, पदाधिकारी सूर्यकांत वाघमारे, अनिल बळवंत, रवींद्र जाधव, किरण वैद्य यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.