सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस च्या वतिने अभिवादन.
लातूर प्रतिनिधी भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या थोर समाजसुधारक, कवयित्री, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लातूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँगेस भवन लातूर या ठिकाणी विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी लातूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल उटगे व लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.किरण जाधव यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच उपस्तिथ सर्व मान्यवरांनी देखील यावेळी विनम्र अभिवादन केले.
यावेळी लातूर शहर जिल्हा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष ॲड.समद पटेल, लातूर शहर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष जालिंदर बरडे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे कार्यालय प्रमुख ॲड. देविदास बोरूळे पाटील,लातूर शहर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष प्रा.प्रवीण कांबळे,ज्ञानोबा गवळे, ज्ञानेश्वर भिसे,नामदेव इगे,पंडित कावळे, ॲड. अंगदराव गायकवाड, बिभीषण सांगवीकर, इसरार पठाण, खंडेराव शेवाळे, राजेश कासार, अनिल माळी, राजेश गुंठे, प्रशांत तिवारी, उमेश परदेशी, संजय सुरवसे, अशोक सूर्यवंशी, अशोक भंडारे यांच्या सह पक्ष पदाधिकारी, सदस्य उपस्तिथ होते.