लातूर विभागीय कुस्ती स्पर्धा संपन्न; लातूरला सर्वाधिक पदक.
लातूर दि 4 जानेवारी क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर यांच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे दिनांक 02 व 03 जानेवारी रोजी संपन्न झालेल्या विभागीय स्पर्धेतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. दि 2 जानेवारी रोजी या स्पर्धेची सुरुवात होऊन दि 3 जानेवारी रोजी सायंकाळी पर्यंत या स्पर्धा चालल्या. या स्पर्धेचे उद्घाटन उद्घाटक अशोक भोसले लातूर कुस्तीगीर परिषद उपाध्यक्ष यांच्या हस्ते झाले; तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका क्रीडा अधिकारी श्री सुरेंद्र कराड यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी तालुका क्रीडा अधिकारी बाबासाहेब क्षीरसागर, सूर्यकांत पवार सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक, पंडित केंद्रे महाराष्ट्र पोलीस गांधी चौक पोलीस स्टेशन लातूर, गोपाळ घारगे उस्मानाबाद कुस्ती निवेदक यांच्या प्रमुख उपस्थिती हा कार्यक्रम संपन्न झाला.

या स्पर्धेमध्ये 14 वयोगटातील 35 कि खालील साहेबराव पाटील लातूर ग्रामीण, 38 किलो कृष्णा तांबोळकर लातूर ग्रामीण, 41 किलो शंभू देशमुख लातूर ग्रामीण, 44 किलो रोहन मोठे लातूर मनपा, 48 किलो शिवराज पाटील उस्मानाबाद, 52 किलो रोहित माने उस्मानाबाद, 57 किलो राजन जगताप उस्मानाबाद, 62 किलो श्रेयस शेळके लातूर मनपा, 75 किलो रणवीर सूर्यवंशी लातूर मनपा, 17 वयोगटातील 45 वजनी गटात गाढवे शंकर लातूर ग्रामीण, 48 तांबोळकर रुद्राक्ष लातूर ग्रामीण, 51 कडवकर सौरभ उस्मानाबाद, 55 आदमाने रोहित लातूर ग्रामीण, 60 भंडारे चिंतामणी लातूर ग्रामीण, 65 हंकारले कार्तिक लातूर ग्रामीण, 71 कतलाकुठे शंकर लातूर मनपा, 80 किलो जाधव आदर्श उस्मानाबाद, 92 किलो दीडवाद्य आकाश लातूर ग्रामीण, 110 किलो राठोड अजय नांदेड ग्रामीण, 19 वयोगटातील 57 किलो खालील जमादार बाळासाहेब लातूर मनपा, 61 किलो पाटील वैभव लातूर मनपा, 65 किलो मुंडे यश लातूर ग्रामीण, 70 किलो घोगरे दयानंद उस्मानाबाद, 74 किलो भोसले ऋषिकेश उस्मानाबाद, 79 किलो बोडके जरासंध नांदेड ग्रामीण, 86 किलो कोचार मारुती नांदेड ग्रामीण, 92 किलो यादव सागर नांदेड ग्रामीण, 97 किलो गरड सागर उस्मानाबाद, 125 किलो लोकरे मोहित उस्मानाबाद याच बरोबर गिरको रोमन या कुस्तीतील क्रीडा प्रकारात 17 वयोगटांमध्ये 45 किलो खालील बिराजदार लातूर मनपा, 48 किलो शिंदे ओमकार उस्मानाबाद, 51 किलो लहाने सुदर्शन लातूर मनपा, 55 किलो सुरवसे शरद लातूर ग्रामीण, 60 किलो टेमराज गोविंद नांदेड ग्रामीण, 65 किलो जाधव शंभू उस्मानाबाद, 71 किलो तनपुरे निखिल उस्मानाबाद, 80 किलो यादव दिनेश नांदेड मयूर लातूर ग्रामीण, 19 वयोगटातील 60 किलो कांदे महेश लातूर ग्रामीण, 67 किलो भोसले समाधान लातूर मनपा, 72 किलो कराड ओम लातूर मनपा, 55 किलो मोहिते सुमित लातूर ग्रामीण, 63 सुरवसे प्रीतम लातूर ग्रामीण, 77 किलो पवार धनराज उस्मानाबाद, 87 किलो सुरनर ज्ञानेश्वर नांदेड ग्रामीण, 130 किलो लोकरे शिवराज उस्मानाबाद याप्रमाणे तर मुलींच्या स्पर्धेत 14 वयोगटांमध्ये 30 किलो खालील बनसोडे श्रुती लातूर मनपा, 36 किलो सूर्यवंशी अंकिता लातूर मनपा, 39 किलो मुचाटे संस्कृती लातूर मनपा, 42 किलो वैष्णवी थोरवे लातूर ग्रामीण, 46 किलो हनुमंत भक्ती लातूर ग्रामीण, 50 किलो चोरमुले तबुजा उस्मानाबाद, 58 किलो धावणे संस्कृती उस्मानाबाद, 54 किलो तेलंगे वैष्णवी लातूर मनपा, 62 किलो प्रणाली नांदेड ग्रामीण त्याचबरोबर 17 वयोगटांतील 43 किलो खालील होगाडे सोनाली उस्मानाबाद, 57 किलो पालवे स्नेहल उस्मानाबाद, 53 किलो मुंडे नंदिनी लातूर ग्रामीण, 61 किलो जमदाडे सृष्टी उस्मानाबाद, 65 किलो खैरमोडे पौर्णिमा उस्मानाबाद, 40 किलो निरगुडे मयुरी उस्मानाबाद, 46 किलो रोहिणी उस्मानाबाद, 73 किलो गोणारे वंदना नांदेड ग्रामीण, 19 वयोगटातील 50 किलो खालील जाधव सानिका नांदेड ग्रामीण, 53 किलो खालील शिंदे तेजस्विनी उस्मानाबाद, 57 किलो खालील परदेशी धनश्री उस्मानाबाद, 55 किलो खालील टेकाळे सोनाली लातूर मनपा, 59 किलो खालील कांबळे भाग्यश्री नांदेड ग्रामीण, 65 किलो खालील सदर अदिती लातूर ग्रामीण, 72 किलो खालील ताटे गायत्री नांदेड ग्रामीण याप्रमाणे विजयी खेळाडूंची नावे असून सदरील विजयी खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील तालुका क्रीडा अधिकारी श्री सुरेंद्र कराड यांनी सांगितले आहे.
स्पर्धेसाठी पंच म्हणून चेतन जावळे, रोहिदास माने, संतोष येगवे, गोपाळ घारगे, शिवरुद्र पाटील, यांनी काम पाहिलेले आहे विभागात एकूण 14 वयोगटातील 39 17 वयोगटातील 41 व 19 वयोगटातील 31 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विजयी पात्र खेळाडूंची जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या व लातूर नेता न्यूज चॅनल च्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.