मिनी ऑलिंपिक साठी लातूरचे हँडबाॅल खेळाडु नागपूरला रवाना.
लातूर दि 04 जाने 05 ते 07 जानेवारी 2023 दरम्यान नागपूर येथे होणाऱ्या मिनी ऑलिंपिक हॅन्डबाॅल स्पर्धेसाठी लातूर जिल्ह्याचा संघ रवाना झाला आहे. या संघात वैभवी बुरगे ,प्रज्ञा वीर, निकिता शिंदे, ऋतुजा जोशी, अनुराधा वाघमारे, माही गायकवाड, प्रणवी सूर्यवंशी, पल्लवी कुरील, श्रावणी ठाकूर, अनामिका प्रजापती, किरण पवार, शताक्षी जाधव ,साक्षी कोंबडे, मेघा चोथवे, अनुप्रिया वाघमारे, वैष्णवी नागरगोजे या खेळाडूंचा समावेश असुन या संघाला प्रशिक्षक श्री सुनील सुरकुटे महाराष्ट्र हॅन्डबाॅल ॲसोसिएशचे सहसचिव तर संघव्यवस्थापक म्हणून वैष्णवी काकडे यांची निवड झाली आहे.

या संघाला विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मा.श्री लक्ष्मीरमणजी लाहोटी, संस्थेचे अध्यक्ष मा.श्री शैलेशजी लाहोटी, संस्थेचे सचिव ॲड.श्री आशिषजी बाजपाई, शालेय समितीचे अध्यक्ष श्री सूर्यप्रकाशजी धूत यांच्यासह गोदावरी देवी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बोरगावकर सुनिता, निरीक्षिका श्रीमती कासार संगिता, क्रीडा विभाग प्रमुख संदीकर योगिता, क्रीडा शिक्षिका डोईजोडे सुवर्णा , सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी खेळाडूंचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.