युवक आणि युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.
लातूर प्रतिनिधी : मनसे सरचिटणीस तथा मनसे शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन शिबिर जयदीप ढवारे यांच्या मार्गदर्शनात पार पडणार आहे. दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना या योजनेमधून ग्रामीण भागातील गरीब,गरजू व बेरोजगार युवक व युवतीना कौशल्याभिमुख रोजगार मिळवण्यासाठी मोफत प्रशिक्षण उस्मानाबाद येथे देण्यात येणार आहे आणि 100 % नोकरीची हमी आहे. यामधून पानगाव व पानगाव परिसरातील 90 मुला मुलींची निवड होऊन त्यांना उस्मानाबाद येथे प्रशिक्षण देण्यासाठी पाठवण्यात येणार आहे.
यावेळी मनसे शेतकरी सेना प्रदेश उपाध्यक्ष भागवत शिंदे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष वाहिद शेख, कामगार सेना जिल्हाध्यक्ष अंकुश शिंदे,स्वयं रोजगार संघटक सचिन शिरसाट, रेणापूर तालुका संघटक श्रीपाल बस्तापुरे, तालुका सचिव भागवत कांदे, तालुका सचिव ज्ञानेश्वर जगदाळे, तालुका उपाध्यक्ष इमरान मणियार, पानगाव ग्रामपंचायत सदस्य सुरेश गालफाडे, तालुका उपाध्यक्ष चेतन चौहान, सरपंच बिबिषण जाधव, विशाल कातळे,अविनाश वाघमारे, शिवराज शिरसाट, लिंबराज जाधव, बाळू स्वामी, राम शिरसाट, हमीद शेख, महादेव शिरसाट, रवी वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
