उस्मानाबादच्या अभिनव स्कूलमध्ये विजेत्या खेळाडूंचा सत्कार.
श्वेता सावंत सह 10 विद्यार्थी ठरले राज्य स्पर्धेसाठी पात्र.
उस्मानाबाद प्रतिनिधी : शहरातील अभिनव स्कूलमधील विविध स्पर्धेतील पदक विजेते व पुढील स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. नुकत्याच जळगाव येथे झालेल्या संघटनेच्या राज्य तायक्वांदो स्पर्धेत श्वेता सावंत या खेळाडूने कास्य पदक मिळविले आहे. तर येथेच होणाऱ्या शालेय राज्य तायक्वांदो स्पर्धेसाठी श्वेता ची लातूर विभागातून निवड झाली आहे. श्वेतासह अभिनव स्कूल च्या अनुष्का वाघमारे, अंक्षीका सुरवसे, नील कासार, अभिजीत वारे, हर्षवर्धन शिंदे, अनुश्री राठोड, शृती वारे, सिया सोमानी, अनुष्का पायाल यांचीही या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याचबरोबर लॉन टेनिस, सॉफ्टटेनिस व स्क्वॅशच्या विभागीय स्पर्धेमध्ये सुयश आडे यांने प्रथम क्रमांक मिळविला असून तो राज्य शालेय स्पर्धेत लातुर विभागाचे प्रतिनिधीत्व करेल.
या खेळाडूना क्रीडा प्रशिक्षक राजेश महाजन, आकाश लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले असून या खेळाडूंचा सत्कार अभिनव स्कूल चे संचालक सतीश मोदाणी, प्राचार्या सौ प्रतिभा
मोदाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.