राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत नयन बारगजे, सार्थक भाकरे ला सुवर्णपदक
राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड; बीडच्या खेळाडूंनी पटकावली १२ पदकं.
बीड प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा खात्या अंतर्गत जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आयोजित राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या खेळाडूंनी २ सुवर्णपदके, २ रौप्यपदके व ८ कांस्यपदके अशी एकूण १२ पदकं जिंकली. कु. नयन बारगजे व सार्थक भाकरे यांनी २ सुवर्णपदके जिंकली असून या दोन खेळाडूंची राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे, अशी माहिती डॉ अविनाश बारगजे यांनी दिली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव आयोजित जळगाव जिल्हा क्रीडा संकुल येथे १६ ते १९ फेब्रुवारी २०२३ दरम्यान राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये औरंगाबाद विभागाचे प्रतिनिधित्व करताना बीडच्या कु. नयन बारगजे व सार्थक भाकरे यांनी सुवर्णपदके पटकावून बीड जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा भर घातली आहे. बीडचे खेळाडू कु. सृष्टी कौशल्ये व प्रथमेश शिंदे यांनी अंतिम फेरीमध्ये मजल मारत २ रौप्यपदके पटकावले. कु.सृष्टी पवार , कु.कार्तिकी मिसाळ , कु.सृष्टी योगे, कु. प्रतिक्षा आमटे, अभिषेक आमटे, प्रतल शेकडे , श्लोक चव्हाण , करण रांजवण यांनी ८ कांस्यपदके जिंकली. बीड जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या पंकज धोंगडे, अर्जुन गवते, स्वराज घोडके, प्रथम इंगळे , सागर केळगेंद्रे , ओमकार परदेशी, सिद्धांत नवले, ओम जगताप, स्वप्निल कोल्हे, तेजस्विनी खाडे, प्रेरणा माळगे, साक्षी जायभाये, यशस्वी चव्हाण, निकिता मोराळे ( केज) व साक्षी केकाण ( अंबाजोगाई) यांनी या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत यशस्वीपणे सहभाग नोंदविला.
सर्व पदक विजेते खेळाडू बीड जिल्हा क्रीडा संकुलातील डॉ अविनाश बारगजे यांच्या तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रात सराव करत आहेत. डॉ. अविनाश बारगजे, जया बारगजे , आंतरराष्ट्रीय खेळाडू अविनाश पांचाळ, बन्सी राऊत सर, प्रसाद साहू सर यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले आहे. यांच्यासह राष्ट्रीय खेळाडू अमित मोरे, अनीस शेख व देवेंद्र जोशी यांनी या स्पर्धेत खेळाडूंना मार्गदर्शन केले.
नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. योगेशभैय्या क्षीरसागर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, अरविंद विद्यागर, क्रीडा अधिकारी पंडित चव्हाण, क्रीडा अधिकारी महेश खुटाळे , योगेश करांडे, कार्याध्यक्ष प्रा.डॉ. राजेश क्षीरसागर, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नितीनचंद्र कोटेचा, डॉ अविनाश बारगजे, दिनकर चौरे , भारत पांचाळ, महीला प्रशिक्षीका जया बारगजे, बन्सी राऊत, मनीश बनकर, डॉ. विनोदचंद्र पवार, प्रा. पी टी चव्हाण, सुनील राऊत, श्रीकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे, अविनाश पांचाळ, नवीद शेख, सचिन जायभाये, डॉ. शकील शेख, उज्वल गायकवाड, नितीन आंधळे, बालाजी कराड, अमित मोरे, सचिन कातांगळे, शुभम खिल्लारे, कृष्णा उगलमुगले, सुशांत सोन्नर, सुरज देशमुख आदींनी पदक विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.