श्री केशवराज प्राथमिक विद्यालयात होळी हा सण उत्साहात साजरा
लातूर दि ०७ श्री केशवराज प्राथमिक विद्यालयात काल होळी सणानिमित्त होळीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शिवाजी हेंडगे, प्रमुख वक्त्या सौ. सूर्यवंशी बाई, विभाग प्रमुख श्री ल . मा. कुलकर्णी हे उपस्थित होते. मंचावरील मान्यवरांच्या हस्ते होळीचे पूजन करण्यात आले. प्रमुख वक्त्या सौ. सूर्यवंशी बाई यांनी विद्यार्थ्यांना होळी सणाचे पारंपारिक महत्त्व गोष्टी रूपाने सांगितले तसेच हा सण साजरा करण्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे ते देखील उदाहरणे देऊन सांगितले. यानंतर अध्यक्षीय समारोप करताना माननीय मुख्याध्यापक श्री हेंडगे सर यांनी विद्यार्थ्यांना होळी करणे म्हणजे आपल्यामध्ये असलेल्या दुर्गुणांची होळी करणे होय. आजच्या दिवशी नैवेद्य म्हणून पुरणाची पोळी केली जाते होळीला नारळ अर्पण केला जातो. होळी हा सण आदिवासी लोकांसाठी दिवाळीप्रमाणे असतो असे मत व्यक्त केले.
यानंतर होलिका दहन करण्यात आले व या होळीमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या मध्ये असलेले दुर्गुण, वाईट सवयी ,या सर्व कागदावर लिहून ते कागद होळीमध्ये टाकले. यानंतर आभार मानून शांति मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. पहिली दुसरी विभागामध्ये होळी या सणाचे महत्त्व सौ. नळगे बाई यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्वाती मोटेगावकर यांनी केले.