खडक हनुमान ते बालाजी मंदिर रस्ता दुरुस्तीसाठी मनपा उपायुक्तांना नागरिकांचे निवेदन.
लातूर दि २८ मार्च शहरातील खडक हनुमान ते बालाजी मंदिर रस्ता दुरुस्तीसाठी लातूर महानगरपालिकेच्या मा.उपायुक्त मयुरी शिंदेकर यांना नागरिकांनी निवेदन दिले आहे. हा रस्ता शहरातील अत्यंत रहदारीचा असुन शहराच्या प्रमुख दोन रस्तांना व जुन्या मंदिरांना जोडणारा आहे. दरम्यान या रस्तावर उमृत योजना, नगरोत्थान योजनांच्या कामामुळे रस्ताची प्रचंड दुरावस्था झाली असुन खड्डे पडले आहेत. या रस्तावर खुप रहदारी असल्यामुळे नेहमीच वाहतुकिची कोंडी होत असते. याच भागात गोदावरीदेवी कन्या शाळेसह इतर सहा मोठ्या शाळाही आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांची सायकल वरुन व स्कुल बस ॲटो ची ये जा करण्यासाठी खुप गर्दी होते प्रसंगी या भागात कर्णकर्कश हाॅर्न चा आवाज नेहमीचाच झाला आहे. या गोंधळामुळे प्रवाश्यांमधे हाणामारी सुद्धा होते. या सर्व बाबींचा विचार करता या भागातील खडक हनुमान, बालाजी मंदिर ते जुना रेणापुर नाका हा रस्ता तात्काळ दुरुस्त होणे अपेक्षित आहे. या बाबतचे निवेदन काल दि २७ मार्च रोजी प्रभाग क्रमांक ०१ व ०८ भागातील नागरिकांनी मनपा अपायुक्तांना दिले आहे.
यावेळी धनंजय हाके, जयप्रकाश जी मंत्री, शिवदयाल बायस,विजय ठाकुर, विकास धायगुडे व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.