लातूर पोलीसांनी केली लातूरसह चार जिल्हातून सराईत गुन्हेगारांची टोळी हद्दपार.

पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी काढले हद्दपारिचे आदेश

लातूर दि ०४ एप्रिल उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या व टोळीने राहणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी सराईत गुन्हेगाराकडून कोणत्याही प्रकारचे गैरकायदेशीर कृत्य घडू नये याकरिता उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळी मधील गुन्हेगारांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहेत. या टोळीचा प्रमुख 1) ओम प्रकाश तुळशीराम याळे, वय 26 वर्ष त्याच्या टोळीतील सदस्य 2) ओमकार योगीराज बिरादार, वय 24 वर्ष 3) महादेव बाबुराव हसनाबादे, वय 22 वर्ष, सर्व राहणार पंढरपूर ,तालुका देवणी जिल्हा लातूर. यांचा समावेश असून आगामी काळात साजरे होणारे सण-उत्सव व येणारे काळात होऊ घातलेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांचे अनुषंगाने त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 प्रमाणे कार्यवाही करून दिनांक 31/03/2023 रोजी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी हद्दपारिचे आदेश पारित करून नमूद तारखेपासून सदरचे सराईत गुन्हेगार हे लातूर, नांदेड ,उस्मानाबाद व परभणी या चार जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहेत. हद्दपार केलेल्या नमूद गुन्हेगारांना उदगीर ग्रामीण पोलिसांची हद्दपार क्षेत्राचे बाहेर नेऊन सोडण्याची कार्यवाही सुरू आहे.

सदर कारवाईच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या सराईत गुन्हेगार, उपद्रवी लोकांवर जरब बसून तीन सराईत गुन्हेगारांची टोळी जिल्ह्यातून हद्दपार केल्यामुळे इतर गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यां गुन्हेगारांना चांगलाच दणका बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!