तपसे चिंचोली येथे भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन.
औसा प्रतिनिधी दि ०४ एप्रिल औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे नरसिंह क्रिकेट संघ आयोजित भव्य खुल्या टेनिस बॉल डे नाईट गाव वाईझ क्रिकेट स्पर्धां, नरसिंह चषक 2023 चे उद्घाटन सोमवारी दि.3 एप्रिल रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी किल्लारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब लिंगे, डिसीबीचे कृष्णा गायकवाड, लामजना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संदीप पेंढारकर, कार्यकारी अभियंता चेतन कलशेट्टी, समाधान मोरे, प्रदीप चव्हाण, महेश सगर, संजय लोंढे, शैलेश बाजुळगे, अक्षय गाडवे, रणजित पाटील, महेश यादव, जगदीश पाटील, नयुब पठाण, सरवदे अप्पा, अविनाश देशमुख, सचिन गरड, सतिष स्वामी, नागेश लादे, बाळासाहेब सुरवसे, मनोज गिरमले यांच्यासह तपसेचिंचोली सह परिसरातील क्रिकेटप्रेमी नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना लिंगे म्हणाले तपसे चिंचोली सारख्या छोट्याशा गावात क्रिकेट स्पर्धेचे अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन करण्यात आले असून, बक्षीस आणि चषक पाहता ग्रामीण भागातील खेळाडूंच्या मनात नक्कीच उत्साह वाढण्यासाठी मदत होईल.