विद्यापीठ क्रीडा अभ्यास मंडळ अध्यक्षपदी प्रा. कैलास पाळणे यांची निवड
लातूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या क्रीडा अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी नळेगाव येथील शिवजागृती महाविद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख प्रा. डॉ. कैलाश शिवहर पाळणे यांची निवड झाली. त्याबद्दल त्यांचा क्रीडा संकुलात महाराष्ट्र व्हॉलीबॉल क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ व्हॉलीबॉल पंच विक्रम पाटील यांच्या हस्ते प्रा. पाळणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वरिष्ठ खेळाडू लिंबराज बिडवे, महेश पाळणे,व्यंकूराम गायकवाड, महेश शिंदे, राष्ट्रीय खेळाडू नीलेश पौळ, विठ्ठल कवरे, नंदू भोसले, हरीश बुढ्ढे, पंकज पाळणे, गणेश हाके, रितेश अवस्थी, अमोल बिरादार, नानासाहेब देशमुख, माधव रासुरे, बप्पा खंडागळे यांच्यासह व्हॉलीबॉल खेळाडूंची उपस्थिती होती.