आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी केले आरोग्य दिनी अवयवदान.

लातूर प्रतिनिधी : जागतिक आरोग्य दिनानिमित्त विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथे विवेकानंद रुग्णालय, लातूर व संवेदना प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित रेटीनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरीटी उपक्रम व अवयवदान अभियानाला उपस्थित राहून लातूर चे माजी पालकमंञी तथा निलंगा मतदार संघाचे आमदार श्री संभाजी पाटील निलंगेकरांनी ‘अवयव दान’ करण्याचा संकल्प केला व त्यासंबंधी संमतीपत्र काल दि ०७ एप्रिल रोजी भरून दिले आहे. आज समाजामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना अवयवाची गरज पडते. परंतु ऐनवेळी अवयव न मिळाल्यामुळे त्यांना प्राणाला मुकावे लागते. अशावेळी जर आपण पुढाकार घेतला व आपल्यानंतर अवयवदान करण्याचा संकल्प केला तर यामुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचू शकतात. आज आरोग्य दिनाचे औचित्य साधत मी स्वतः यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे इतर नागरिकांनी देखील पुढाकार घेऊन या मानवतावादी कार्यामध्ये सहभाग नोंदवावा, असे अवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पद्मभूषण डॉ. अशोकरावजी कुकडे काका, खासदार सुधाकरजी श्रृंगारे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनवजी गोयल, अधिष्ठाता डॉ. समीरजी जोशी, डॉ. राधेश्यामजी कुलकर्णी, डॉ. राजेशजी पाटील, संतोषकुमारजी नाईकवाडी, सुरेशदादाजी पाटील आदी मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!