डाॅ बाबासाहेब जयंतीनिमित्त लोकनायक संघटनेकडुन शालेय साहित्य वाटप.
लातूर दि 15 एप्रिल विश्वरत्न डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिक्षणासाठी पुरेस साहित्य उपलब्ध नसलेल्या शहरातील शास्ञी नगर भागात लोकनायक सामाजिक संघटनेच्या वतिने शालेय साहित्य व अन्नदान वाटप करण्यात आले. डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त इतर वाया जाणारा खर्च टाळुन डाॅ बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हटल्याप्रमाणे लोकनायक संघटनेने हा उपक्रम हाती घेतला होता.

यावेळी लोकनायक संघटनेचे अध्यक्ष महादूभाऊ रसाळ, सचिव बंटी गायकवाड जिल्हा अध्यक्ष किशन आण्णा कदम, रहीम शेख, नागूभाऊ कांबळे, शादुल शेख, आश्रुबा रसाळ, किशोर रसाळ, महेश शेंडगे व विद्यार्थी उपस्थित होते.
