शाहुनगरातील संत गोरोबाकाका मंदिरात महिलांचा पुढाकाराने होतोय अखंड हरिनाम सप्ताह.
लातूर दि 18 एप्रिल शहरातील शाहू नगरात स्थित असलेल्या संत गोरोबा काका मंदिरात महिलांनी पुढाकार घेत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे या महिला स्वतः सर्व सप्ताह पार पाडत आहेत. याचे सर्वञ कौतुक होत आहे. या महिलांचा अखंड हरिनाम सप्ताह हा जिल्हातील पहिला असा सप्ताह असावा जो महिला एकत्र येऊन विविध उपक्रम राबवित साजरा करत आहेत असे मत प्रभाग क्रमांक तिन चे काँग्रेस अध्यक्ष श्री विकास कांबळे यांनी लातूर नेता न्युज शी बोलताना सांगितले आहे.
या सप्ताहात मनीषा गोजमगुंडे , भारत पासमे, प्रभावती गोजमगुंडे, विमल कुंभार, सुलोचना कुंभार, उषा भंडारकोठे, सत्यभामा सुरकुटे, गोगल भंडारकोठे, रत्नमाला सोनार, उषा मृगजळे, रोहिणी गंबिरे, बंडापल्लेबाई, माडेबाई, रंजना गुंडरे, नीता गांगगले, सविता कुंभार, हिरकणाबाई ननंदकर, रुक्मिणीबाई जाधव, सखुबाई गांगले या महिलांच्या पुढाकाराने पार पडत आहे. याचे श्री कांबळे यानी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.