जेष्ठ पञकार रामराव गवळी यांचा सहपत्नीक खासदार दलवाई यांच्या हस्ते सन्मान.
लातूर प्रतिनिधी : एस. एम. जोशी फोंडेशन, पुणे आणि भारतीय भटक्या – विमुक्त जमाती विकास संघटनेतर्फे ३० एप्रिल रोजी राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त आयोजित सामाजिक न्याय व सलोखा परिषदेत आंबेडकरी पत्रकारिता व चळवळीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल रामराव गवळी यांचा माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या हस्ते सपत्नीक सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी (डावीकडून) माजी आमदार पंडितराव देशमुख, डाॅ. अनिल जायभाये, सुधा गवळी, अयानुल अत्तार, प्रा. सुशिला मोराळे, रामराजे अत्राम व साथी सुभाष लोमटे दिसत आहेत.