काँग्रेस प्रभाग अध्यक्ष विकास कांबळे यांनी ”दक्ष अकॅडमी” चे राजकुमार अंबुलगे यांचा केला सत्कार.
दक्ष अकॅडमी चे 28 विद्यार्थ्यांचे पोलीस भरतीत यश.
लातूर प्रतिनिधी, लातूर शहरातील विवेकानंद चौक ते बाबळगाव रोड येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर, राजकुमार अंबुलगे यांनी ”दक्ष अकॅडमी” ची स्थापना केली. या दक्ष अकॅडमी प्रशिक्षण केंद्रात अनेक मुला मुलींनी प्रवेश घेत प्रशिक्षण पूर्ण केले व महाराष्ट्रातील पोलीस भरती होण्यासाठी विविध जिल्ह्यात फॉर्म भरत पोलीस भरतीसाठी ”दक्ष अकॅडमीचे” विद्यार्थ्यांनी आभार मानत मैदानी व लेखी परीक्षा देत विद्यार्थ्यांनी दक्ष अकॅडमीचे महाराष्ट्रात नाव कमीवले आहे. दक्ष अकॅडमी चे विद्यार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यात फॉर्म भरत पोलीस भरतीसाठी गेले असता या पोलीस भरतीत 28 विद्यार्थ्यांनी बाजी मारत पोलीस भरती मध्ये यश मिळवत दक्ष अकॅडमी चे नाव गाजवले आहे. यामुळे ”दक्ष अकॅडमी” चे श्री. राजकुमार अंबुलगे सरांचा काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 3 काँग्रेस अध्यक्ष विकास कांबळे यांनी विवेकानंद चौकातील प्रभाग कार्यालयात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राजकुमार अंबुलगे यांनी पोलीस भरतीत यश आलेले 28 विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, देश सेवा करणे हेच ध्येय ठेवा असे सांगितले.
यावेळी ॲड. राजेंद्र लोंढे, ॲड.लालासाहेब शेख, अजय आडगळे, नबी नळेगावकर, अब्दुल समद शेख, सय्यद इलियासभाई, अजहरभाई सय्यद, शंकर कांबळे आदीसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.