कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा गौरव.
लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम; मे महिन्यातील कामाचा उत्कृष्ट तपशील.
लातूर दि 27 मे पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या दर महिन्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार याचा गौरव करण्यात येतो. मे महिन्यातील अश्या उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. या मधे गुड डिटेक्शन पोलीस उपनिरीक्षक गोविंद राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर शिंदे, पोलीस संदिप कांबळे, पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस योगेश (बंटी) गायकवाड, गुन्हे निर्गती स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, सहायक पोलीस निरीक्षक धनंजय डोणे, सीसीटीएनएस डाटा फिडींग स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस जरिना सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक धनंजय डोणे, मंदोदरी पांचाळ, डायल 112 तात्काळ प्रतिसाद पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, रवी शेळके, संतोष पोते, अरुण मुळे, सहायक पोलीस निरीक्षक नाना लिंगे, उत्कृष्ट प्रतिबंधक कारवाई पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहायक पोलीस निरीक्षक नाना लिंगे, समन्स बजावणी कामगिरी स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोरख क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण, पोलीस कॉन्स्टेबल गंगाधर गोडे, वारंट बजावणी कामगिरी स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर पोलीस हेड कॉन्स्टेबल बि एम गुंटे, सहायक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवानंद नागरे, कौतुकास्पद कामगिरी ईश्वर बिराजदार, अजय भंडारे, श्रीकांत बरिदे, मदन माळी, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांचा समावेश आहे.