राज्यस्तरीय सीनियर तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या खेळाडूंना ४ पदकेराज्यस्तरीय सीनियर तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या खेळाडूंना ४ पदके

राज्यस्तरीय सीनियर तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या खेळाडूंना ४ पदके

खेलो इंडिया” वुमेन्स लीग साठी कु. नयन बारगजे हिची महाराष्ट्र संघात निवड.

बीड प्रतिनिधी : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई या एकमेव अधिकृत राज्य संघटनेकडून आयोजित ३४ वी महाराष्ट्र राज्य सीनियर तायक्वांदो स्पर्धेत क्योरोगी प्रकारात पुणे जिल्हा संघाने सर्वाधिक १३ सुवर्णपदके जिंकून वर्चस्व राखले. बीडची राष्ट्रीय पदक विजेती खेळाडू कु. नयन बारगजेने जिंकले असून तिची केरळ येथे होणाऱ्या खेलो इंडिया वुमेन्स तायक्वांदो लीग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बीडचा वरिष्ठ खेळाडू युवराज पोठरे, ऋत्विक तांदळे व सुदर्शन गायकवाड यांनी जळगाव येथील राज्य स्पर्धेत कांस्यपदके जिंकले आहेत.

तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई संघटना आयोजित जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने शिवछत्रपती जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे ३४ वी महाराष्ट्र राज्य तायक्वांदो स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय सीनियर तायक्वांदो स्पर्धेसाठी तर केरळ येथील ‘खेलो इंडिया’ वुमेंस लीग साठी निवडी मुळे या राज्य स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. जवळपास ३०० खेळाडूंनी महाराष्ट्रातून या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवला .

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या एकमेव राष्ट्रीय खेळ संघटनेस इंडियन ऑलिंपिक असोसिएशन (IOA) व भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिलेली असून महाराष्ट्रामध्ये तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई या अधिकृत राज्य संघटनेने जळगाव येथील राज्य स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने जळगाव येथील शिवछत्रपती जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे ३४ व्या महाराष्ट्र राज्य सीनियर तायक्वांदो स्पर्धेचे बक्षीस वितरण राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा महासचिव मिलिंद पठारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा तांत्रिक समिती प्रमुख प्रवीण बोरसे, राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष वेंकटेश्वरराव कर्रा, जळगाव जिल्हा संघटनेचे सचिव तथा राज्य संघटनेचे सदस्य अजित घारगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले. बीडच्या खेळाडूंनी १ रौप्य व ३ कास्य असे एकूण आठ पदके जिंकली. बीडची राष्ट्रीय पदक विजेती खेळाडू कु. नयन बारगजे हिना जिंकले असून तिची केरळ येथे होणाऱ्या खेलो इंडिया वुमेन्स तायक्वांदो लीग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बीडचा वरिष्ठ खेळाडू युवराज पोठरे, ऋत्विक तांदळे व सुदर्शन गायकवाड यांनी जळगाव येथील राज्य स्पर्धेत कांस्यपदके जिंकले आहेत. स्पर्धेमध्ये प्रशिक्षक म्हणून पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे व पारस गुरकुदे यांनी काम पाहिले. अनिश शेख यांनी या स्पर्धेमध्ये पंच म्हणून काम पाहिले. राष्ट्रीय खेळाडू देवेंद्र जोशी, वैभव काळे, आतिश कोकाटे, अमृता गायकवाड, धनश्री सारुक यांनी ही बीड जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व केले. हे सर्व पदक विजेते जिल्हा स्टेडियम येथील डॉ. अविनाश बारगजे यांच्या तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रातील खेळाडू आहेत.

१६ वजनी गटातील सुवर्णपदक विजेते खेळाडू ९ ते १२ सप्टेंबर २०२३ दरम्यान आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय सीनियर स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील, शिवाय यावर्षी गोवा येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत असल्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष व महिला दोन्ही संघ पात्र करणे हे खेळाडूंची प्राथमिकता असेल. या राज्य स्पर्धेमधील सुवर्णपदक व रौप्यपदक विजेत्या प्रत्येक वजन गटातील दोन खेळाडू महिला खेळाडू केरळ येथे सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या ‘खेलो इंडिया’ वुमेन्स लीग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर , डॉ.योगेशभैय्या क्षीरसागर , डॉ. सारिकाताई क्षीरसागर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नितीनचंद्र कोटेचा, दिनकर चौरे, जया बारगजे , बन्सी राऊत, भारत पांचाळ, मनीष बनकर, सुनील राऊत, पी टी चव्हाण, श्रीकांत पाटील, आंतरराष्ट्रीय खेळाडू आविनाश पांचाळ, सचिन जायभाय, शेख नवीद, सचिन कातांगळे यांनी या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

वरिष्ठ गटातील खेलो इंडिया वुमेन्स लीग साठी निवडलेल्या खेळाडू- ४६ किलो वजन गट सुवर्णपदक साक्षी पाटील (पुणे) रौप्यपदक स्वरूपा कोठावळे (औरंगाबाद) ४९ किलो वजन गट सुवर्णपदक मृणाल वैद्य (पुणे), रौप्यपदक वंशिका पटेल (मुंबई उपनगर) ५३ किलो वजन गट- सुवर्णपदक निशिता कोतवाल (पुणे), रौप्यपदक नयन बारगजे (बीड) ५७ किलो वजन गट सुवर्णपदक श्रुतिका टकले (पुणे), रौप्यपदक वसुंधरा चेडे (ठाणे) ६२ किलो वजन गट सुवर्णपदक भारती मोरे (पुणे) रौप्यपदक गायत्री बिनवडे (मुंबई उपनगर) ६७ किलो वजन गट सुवर्णपदक वंशिका रानोट (ठाणे), रौप्यपदक मनीषा गुटेकर (पुणे) ७३ किलो वजन गट सुवर्णपदक अनामिका डेका (ठाणे), रौप्यपदक श्रेया पारडकर (औरंगाबाद) ७३ किलो वरील वजन गट सुवर्णपदक नम्रता तायडे (पुणे), रौप्यपदक महालक्ष्मी कांडेकर (पालघर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!