इनरव्हिल क्लब व प्रजापिता ब्रम्हकुमारी यांच्याकडून भारतीय जवानांसाठी विविध उपक्रम.

लातूर दि 18 सप्टेंबर इनरव्हिल क्लब व प्रजापिता ब्रम्हकुमारी या सामाजिक संस्थांनी लातूर येथे स्थित असलेल्या भारतीय जवानांच्या सि आर पि एफ कॅम्पस ला भेट देत सदैव देशाची सुरक्षेची सेवावृत स्वीकारणाऱ्या भारतीय जवानांचे हात नेहमी प्रबळ रहावे यासाठी इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा सौ मेघा अग्रोया व सचिव अंकिता कोटलवार यांच्या समुहाने राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. भारतीय जवान आपल्या कुटुंबापासुन नेहमीच दुर असतात ते अनेक ताण तणावातून आपले जीवन जगत असतात त्यांचा ताण स्वतःहून कसा कमी करायचा यासाठी सौ नंदा यांनी मार्गदर्शन केले तर इनव्हिल क्लबच्या माजी अध्यक्षा सौ ममता जोशी यांनी कॅन्सर मुक्त जिवनासाठी जिवन निवडा; तंबाखू नाही! असा सल्लाही दिला आहे.

यावेळी सी आर पी एफ कॅम्पस मधील अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांच्यासमवेत इनरव्हिल क्लबच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या.
