धाराशिव जिल्हातील लोहार्यात खुलेआम अवैध धंदे; पोलिस अधीक्षक लक्ष देतील का?
तालुक्यातील अवैध धंद्यांना चाप बसवणार का? कि लोहारा पोलीस निरीक्षकाला प्रोत्साहित करणार.
लोहारा दि 28 सप्टेंबर धाराशिव जिल्हातील लोहारा तालुका हा लहान क्षेञफळाचा तालुका असुन याकडे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन गांभीर्यपूर्वक पाहत नाहित. या तालुक्यातील मोठे ग्रामपंचायत असलेल्या हद्दीत मटका, जुगार, अवैध दारु विक्री, विना परवाना दारु वाहतुक, गौण खनिज वाहतुक, अवैध प्रवासी वाहतूक राजरोसपणे केली जाते याकडे स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस ठाणे लोहारा अगदी डोळेझाक कशी करु शकते! हे येथील नागरिकांना समजत नाही असे नाही. नाकरीक सांगतात लोहारा पोलीस स्टेशनला कोणाची जरब उरली नाही. येथे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी आपली मनमानी करतात सामान्य जनतेला कितीही ञास झाला तरी यांना काही घेणे देणे नसते. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. लोहारा शहरात येणारे प्रमुख चार मार्ग आहेत. या चारही मार्गावर प्रवाश्यांची खाजगी वाहनातून अवैध वाहतूक चालते.

हे अगदी बस स्थानकासमोर वाहने उभी करुन भरगच्च प्रवाशी भरतात. प्रवाश्यांकडुन मनमानी अवाजवी रकमा उकळतात. प्रवाश्यांनी काही विचारणा केली कि बिनधास्त त्यांच्या अंगावर जातात कुण्याच्या बापाची भिती आहे का? “पोलिसाला हप्ते देताव तवा गाडी चालवताव” म्हणतात यांची नेहमीच अरेरावीची भाषा असते. या अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांचा एवढा माज कसा वाढु शकतो? लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुग गिळून गप्प कसे काय असाही सवाल येथील नागरिकांकडुन व्यक्त केला जातोय. या तालुक्यातील कोणत्याही हाॅटेल रेस्टॉरंट धाब्यावर अगदी सहज दारु उपलब्ध होते. येथे बसुन आरामात दारु रिचवणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शिवाय मानवी शरिराला प्रचंड घातक असणारी बनावट दारुही येथे मोठ्या प्रमाणावर विकली जाते असा संशय व्यक्त केला जातोय. येथे अवैध धंद्यांचे प्रमाण एवढे वाढले आहे कि नागरिकांना प्रचंड आत्मविश्वास झाला आहे ते लातूर नेता न्यूज चॅनल ला कमेंट करुन कळवतात

लोहारा तालुक्यातील ‘अवैध धंद्याविरुद्ध कारवाई आणि अवैध धंदे बंद करणे शक्यच नाही; दम असेल बंद करुन दाखवा ! मानवी जिवन विस्कळीत करणारी अवस्था या भागात निर्माण झाली असुन या मतदारसंघाचे प्रभावी आमदार श्री ज्ञानराज चौगुले, सुपर हिरो खासदार श्री ओमराजे निंबाळकर व जिल्हाचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी याकडे गांभीर्यपूर्वक पाहणार का? तालुक्यातील अवैध धंद्यांना चाप बसवणार का? कि लोहारा पोलीस निरीक्षकाला प्रोत्साहित करणार असाही प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.