असा कसा मौलाना? तिन बायका तेरा मुलावर समाधान काय होईना.
विवाहितेवरील अत्याचारप्रकरणी लातूर पोलीसात गुन्हा दाखल.
लातुर दि ०९ नोव्हेंबर शहरातील एका विवाहित महिलेवर अत्याचार प्रकरणी स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६४२ / २०२३ कलम ३७६ (२), (एन), ३७७, ६७ (अ) भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने तक्रारीत म्हटले आहे, कि मौलाना ईस्माईल करीम शेख राहणार मदनी चौक, लातूर याने मला विविध ठिकाणी नेऊन अत्याचार केले. शिवाय, लातुरातील घरीही अत्याचार केले. तो मोबाइलवर सतत बोलत होता. तुला मला भेटायचे आहे असे सांगत होता. अखेर त्रासाला कंटाळलेल्या पीडितेने याबाबतचे कथन पतीकडे केले. मौलाना घरी आल्यावर पुरावा म्हणून पतीने चित्रीकरण केले. हे चित्रीकरण पाहून पतीने त्यांच्या ओळखीच्या फईम सय्यद (रा. लाल गोदाम, लातूर) याला बोलावून घेत घडलेला प्रकार सांगितला. यावर काय करता येईल? अशी विचारणा केली. त्यावर त्याने मी तुला न्याय देतो, असे म्हणून पतीच्या मोबाइलमधील ती क्लीप आपल्या मोबाइलमध्ये घेतली आणि सर्वत्र व्हायरल केल्याचे समोर आले असल्याचे तपास अधिकारी यांच्याकडून समजते.
मोलानाचे तिन लग्न झाले असुन तेरा अपत्य असल्याचे बोलले जात आहे. तरीही विवाहितेवर त्याचा डोळा होता. पिडित महिलेला अनेक वर्षांपासून तो संपर्कात होता त्याचे हे कृत्य थांबत नसल्याने तिच्या घरच्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे समजते. घडलेला हा प्रकार पाहून समाजात मोठा संताप व्यक्त होताना दिसत असुन समाजाच्या वतिने एक बैठक पार पडली आहे ज्या बैठकीत या मौलानाला मौलाना म्हणुन महत्व देऊ नये असा सर्वानुमते ठरावही घेतल्याचे समजते. मौलानाचे राजकिय संपर्क असुन सामाजिक संस्था व मदरसा चालवतो तो चालवत असलेल्या मदरस्यात अनेक अनाथ व गरीब घरातील मुली शिकत आहेत. त्यांच्या सोबतही असा लैंगिक छळ होत असेल याची शक्यता नाकारता येत नसल्याचे समाजातून बोलले जात आहे.