निलंबित पोलिस निरीक्षक नागरगोजे यांनी गळफास घेत संपवली जीवन याञानिलंबित पोलिस निरीक्षक नागरगोजे यांनी गळफास घेत संपवली जीवन याञा

निलंबित पोलिस निरीक्षक नागरगोजे यांनी गळफास घेत संपवली जीवन याञा

अंबाजोगाईतील घटना; कुटुंबीय गावी गेल्‍याने घरी होते एकटेच.

बीड प्रतिनिधी : एप्रिल महिन्यात निलंबित झालेले माजी पोलिस निरीक्षक सुनिल नागरगोजे यांनी अंबाजोगाई येथील भाड्याने रहात असलेल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री ८ वाजता उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात आश्चर्यचा धक्का बसला आहे.

परळी तालुक्यातील नागदरा हे सुनील नागरगोजे यांचे मूळ गाव आहे. मात्र अनेक वर्षांपासून कुटुंबियांसह अंबाजोगाईत वास्तव्यास होते. परभणी, लातूर, बीड येथे त्यांनी काम केले होते. लातूर येथे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार सांभाळला होता. परभणी येथे त्यांनी एका पोलिस अधीक्षकांना शिविगाळ केली होती. त्या प्रकरणात चौकशी सुरू होती. बीडला बदली झाल्यानंतरही त्यांनी एका कर्मचा-याला शिविगाळ करून धमकी दिली होती. बीडला त्यांना नियंत्रण कक्षातच ठेवेले गेले होते. परभणीच्या प्रकरणात एप्रिल २०२५ मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. तेंव्हापासून ते नैराश्यात होते. मुले पुण्याला शिक्षण घेत असल्याने त्यांच्या पत्नी मुलांकडे पुण्याला गेल्याचे बोलले जात आहे. अंबाजोगाई येथे घराचे बांधकाम सुरू असल्याने अंबाजोगाई येथील भाड्याचा घरी सुनिल नागरगोजे हे एकटेच होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान सुनील नागरगोजे यांनी आत्महत्या कधी व का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन सुनील नागरगोजे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी तथा शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!