विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेस ला निवडणुकीत कोणीही पराभूत करू शकत नाही -सहकार महर्षी दिलीपराव देशमुख.
लातूर प्रतिनिधी : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने भारत जोडो यात्रेचा "हात से हात जोडो अभियान" हा विस्तारित कार्यक्रम दिला आहे, यासंदर्भात विस्तृत नियोजन करण्यासाठी आणि देशाचे नेते मा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या "भारत जोडो यात्रे" चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हिंगोली येथे लातूर जिल्हा व शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या अतिभव्य स्वागत व यासाठी लातूर जिल्हाभरातून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा आणि अभिनंदन करण्यासाठी सहकारमहर्षी मा. दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली आज शुक्रवार, दि.०६ जानेवारी २०२३ रोजी काँग्रेस भवन, लातूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
राहुल गांधी यांनी देशभरामध्ये एक प्रेमाचा संदेश देत ऐतिहासिक अशी भारत जोडो यात्रा काढली आणि देशानेही या यात्रेचे उत्तर उत्स्फूर्त असे स्वागत केले, ही यात्रा केवळ भारत जोडो यात्रा राहिली नसून दिलसे दिल जोडो यात्रा झाली आहे असे सांगत पुढे पक्षाने ठरवलेल्या हात से हात जोडो अभियानाला लातूर जिल्हा ही अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देईल याबद्दल शंका नसल्याचे मत राज्याचे माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी आज काँग्रेस भवन येथे व्यक्त केले. काँग्रेसची परंपरा ही उज्वल परंपरा असून काँग्रेसने देश घडवण्याचे काम केले आहे तर काही पक्ष देश तोडण्याचे काम करत आहेत असे सांगत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशातील एकात्मता टिकावी आणि देशाचा विकास घडावा यासाठी सदैव लोकांप्रती तत्पर असावे असेही यावेळी त्यांनी सांगितले. या पुढच्या कोणत्याही निवडणुका जर विकासावर झाल्या तर काँग्रेस पक्ष नेहमीच नंबर एक वर असेल असे प्रतिपादन यावेळी दिलीपरावजी देशमुख साहेब यांनी केले. लातूर जिल्हा व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने कोरोना काळात केलेले अनेक उपक्रम ही काँग्रेसची परंपरा आणि आणि लोकांप्रती असलेली असलेली आपुलकी दर्शवणारे कार्य होते लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीने राबविलेले नेत्र शस्त्रक्रिया शिबिर असो की रक्तदान शिबिर असो,लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने राबवलेले अन्नदान महायज्ञ असो या आणि अशा अनेक उपक्रमांनी जनतेप्रती पक्षाची असलेली भावना अधोरेखित होते असे सांगत यापुढेही पक्षाने सामान्य जनतेच्या प्रश्नावर जनतेत जाऊन कार्य करावे अशा सूचना त्यांनी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव यांनी आपल्या कार्यकाळातील कामकाजाचा आढावा देत होऊ घातलेल्या कार्यक्रमाची माहिती सर्वांना दिली. लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी याप्रसंगी हात से हात अभियानाबद्दल व जिल्हा काँग्रेस कमिटीने आजपर्यंत केलेल्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव अभय साळुंके यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ला अभिप्रेत असलेल्या हात से हात जोडो अभियानाबद्दल सविस्तर माहिती देत हे अभियान गावापासून शहरापर्यंत यशस्वी करावे आणि काँग्रेस पक्षाला गत वैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पक्षाने दिलेल्या कार्यक्रमावर योग्य नियोजन करत काम करावे ही अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी अहमदपूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदी डॉ. गणेश कदम, शिरूर अनपाळ तालुका काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील, देवणी तालुका काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्षपदी माधव बेंजर्गे यांच्या निवडीबद्दल नियुक्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ओमप्रकाश झुरूळे यांनी केले. सूत्रसंचालन सचिन सूर्यवंशी यांनी तर आभार रेणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रवीण पाटील यांनी मानले. यावेळी साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद आबा जाधव, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष रवींद्र काळे,पृथ्वीराज शिरसाट,महिला काँग्रेस अध्यक्ष सुर्यशिला मोरे, सेवादल अध्यक्ष रमेश सूर्यवंशी, सोशल मीडिया अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष प्रा. प्रवीण कांबळे, एन एस यु आय जिल्हाध्यक्ष शरद देशमुख, फारुक शेख, गोरोबा लोखंडे, मिटकरी आप्पा, ॲड.देविदास बोरुळे पाटील, डॉ.भातांब्रे,चंद्रकांत धायगुडे,युवक काँग्रेस अध्यक्ष इमरान सय्यद, सचिन दाताळ, प्रा.राजकुमार जाधव,कल्याण पाटील, विजयकुमार पाटील, सुभाष घोडके, आबासाहेब पाटील उजेडकर, मारोती पांडे, युनुस मोमीन, सोनू डगवाले, आयुब मणियार,इसरार सगरे, आसिफ बागवान,तबरेज तांबोळी महेश धुळशेट्टी, यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.