ऑल इंडिया युनिव्हर्सिटी तायक्वांदो स्पर्धेसाठी धनश्री मदने रवाना.
लातूर दि 07 जाने अमृतसर येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ऑल इंडिया युनिव्हर्सिटी तायक्वांदो स्पर्धेसाठी विश्व तायक्वांदो ॲकदमीच्या कु धनश्री मदने ची निवड झाली असून हि निवड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिवर्सिटी अंतर्गत झाली आहे. नुकत्याच झालेल्या युनिवर्सिटीच्या झोन अंतर्गत स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत हे यश संपादन केले होते. मदने आता अमृतसर येथे होत असलेल्या ऑल इंडिया युनिवर्सिटी तायक्वांदो स्पर्धेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिवर्सिटीचे प्रतिनिधीत्व करणार असुन ती 2 डॅन ब्लॅक बेल्ट पदवी धारक आहे. तिने आतापर्यंत विविध स्तरावरील शालेय स्पर्धेत व असोसिएशन अंतर्गत आयोजित स्पर्धेत पदक विजेती आहे.

या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी मदनेला तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर चे अध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील सचिव नेताजी जाधव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.