मसला येथे तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना.
खासदार सुधाकर शृंगारे आणि डॉ. भिमराव आंबेडकर यांची उपस्थिती.
लातूर तालुक्यातल्या मसला येथील विहारात तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची आज दि 07 जाने रोजी प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमास खासदार सुधाकर शृंगारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर डॉ. इंद्रजित आल्टे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उदघाटन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी मंचावर संजय सावंत , प्रशांत वासनिक, प्रा. बापूसाहेब गायकवाड, अर्चनाताई आल्टे , नवनाथ आल्टे, डॉ. निशिकांत आल्टे, डॉ. रानबा आल्टे, ॲड. गणेश आल्टे, सिद्धार्थ आल्टे, डि.एन. नरसिंगे, जगदीश माळी, सुरेश आल्टे, सुखदेव आल्टे, शंकर वाघमारे, पंढरी आल्टे , संयोजक – सरपंच नरेंद्र आल्टे , स्वागताध्यक्ष विलास आल्टे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली , या शोभायात्रेत मोठ्या संख्येने उपासक आणि उपासिका सहभागी झाले होते. खासदार सुधाकर शृंगारे, डॉ. भिमराव आंबेडकर आणि डॉ. इंद्रजित आल्टे यांची यावेळी भाषणे झाली.