स्थानिक गुन्हे शाखेची जुगार अड्ड्यावर धाड 9 जणांसह 9 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त.
मुंबई जुगार कायद्यान्वये कारवाई व गुन्हा दाखल.
लातूर दि 08 जाने या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे.
अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 07/01/2023 रोजी सायंकाळी 18.30 वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मौजे चीघळी गावाचे शिवारातील बाळासाहेब कांतराव पाटील याचे शेतातील पत्र्याच्या शेड वर छापा मारला असता तेथे इसम नामे 1) बाळासाहेब कांतराव पाटील राहणार चिघळी तालुका उदगीर 2)जनार्दन रघुनाथ पेठे, वय 35 वर्ष, राहणार गुरदार, तालुका उदगीर. 3) गंगाधर धोंडीबा सोनटक्के, वय 28 वर्ष, राहणार लोहारा, तालुका उदगीर. 4) ओमप्रकाश बाबुराव जाधव, भाकसखेडा, तालुका उदगीर. 5) वसंत कांतराव पाटील, वय 40 वर्ष, राहणार चिघळी, तालुका उदगीर. 6) प्रशांत शेषराव पाटील, वय 50 वर्ष, राहणार देवर्जन, तालुका उदगीर. 7) मनोज रामराव शिवहार, 38 वर्ष, राहणार लोहारा, तालुका उदगीर. 8) प्रशांत रमाकांत सोनटक्के, राहणार लोहारा, तालुका उदगीर. 9)बालाजी सुभाष पेठे, वय 42 वर्ष, राहणार गुरदाळ, तालुका उदगीर. असे नमूद ठिकाणी ग्रुप करून स्वतःच्या फायद्यासाठी पत्त्यावर पैसे तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना आढळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन व वाहने असा एकूण 9 लाख 56 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून नमूद आरोपी विरोधात पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 19/ 2023, कलम 12(अ) मुंबई जुगार अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद मुद्देमाल व नऊ इसमांना पुढील तपास कामी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वातील पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शैलेश जाधव,पोलीस अंमलदार बालाजी जाधव, खुर्रम काझी, विनोद चिलमे, रवी कानगुले, नकुल पाटील यांनी केली आहे.