Neharu yuva kendraNeharu yuva kendra

नेहरू युवा केंद्राच्या जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न.

लातूर, दि 09 जाने युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत कार्यरत लातूर नेहरू युवा केंद्रामार्फत ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्तरावर क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 4 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे उत्साहात पार पडल्या. व्हॉलीबॉल, कब्बडी, लांब उडी, उंच उडी, 100 मीटर धावणे आदी स्पर्धांचा यामध्ये समावेश होता. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविला. समारोपीय कार्यक्रमात विजेत्या खेळाडूंना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन गोस्वामी होते.

मुलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये नळेगाव स्पोर्टस क्लबने प्रथम, निलंगा यशवंती स्पोर्टस क्लबने द्वितीय क्रमांक पटकाविला. कब्बडी स्पर्धेत प्रथम क्रमांक रेणापूर येथील जयहनुमान क्रीडा मंडळाने, तर द्वितीय क्रमांक्त काटगाव येथील सेवामाया क्रीडा मंडळाने पटकाविला. लांब उडी स्पर्धेत मुळे प्रेम राम याने प्रथम, प्रथमेश बालाजी याने द्वितीय आणि विभुते शिवराज याने तृतीय क्रमांक मिळविला. उंच उडी स्पर्धेत पठाण ईलीयासने प्रथम, प्रथमेश कुडदेने द्वितीय, तर आदित्य पुरी याने तृतीय क्रमांक मिळविला. 100 मीटर धावणे स्पर्धेत मुळे प्रेम याने प्रथम, कुटवाड लक्ष्मण याने द्वितीय, तर जाधव प्रितम याने तृतीय क्रमांक पटाकावला.

मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत शिरूर ताजबंद येथील महेश विद्यालयाने प्रथम, लातूरच्या दयानंद महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळविला. कब्बडी स्पर्धेत रेणापूरच्या जयहनुमान क्रीडा मंडळाने प्रथम, काटगाव येथील सेवाभाया क्रीडा मंडळाने द्वितीय क्रमांक पटकाविला. लांबउडी स्पर्धेत धुमाळ शितल अनंत हिने प्रथम, यशोदा पाटील हिने द्वितीय, सारीका राजगीरवाड हिने तृतीय क्रमांक पटकाविला. उंच उडी स्पर्धेत सपना मोरे हिने प्रथम, लक्ष्मी सुर्यवंशी हिने द्वितीय, जयश्री पवार हिने तृतीय क्रमांक मिळविला. 100 मीटर धावणे स्पर्धेत सारीका राजगीरवाड हिने प्रथम, शितल हल्लाळे हिने द्वितीय, यशोदा पाटील हिने तृतीय क्रमांक पटकाविला.

जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक संजय ममदापुरे, अविनाश डुम्मपले, प्रशांत साबने, परमेश्वर बिरादार, प्रणव बिराजदार, ज्ञानेश्वर परगेवार, रविकांत गुंजीटे, अंकुश सांळुके, पाटील रोहीणी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!