महाराष्ट्र स्टेट कनोईंग अँड कयाकिंग ऑलिंपिकसाठी लातूर संघ रवाना.
लातूर दि ०९ जाने सांगली येथे दिनांक ८ ते ११ जानेवारी दरम्यान होत असलेल्या महाराष्ट्र स्टेट ऑलिंपिक गेम्स साठी कनोईंग अँड कयाकिंग या साहसी जलक्रिडा प्रकारात लातूरच्या संघाची निवड झाली असून यामधे सुर्यकांत मोरे, दत्तू झिरमिर, गजानन मुरकुटे, किरण मल्लीले हे चार खेळाडू लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. प्रशिक्षक दीपक गाडेकर व भूषण भावे यांनी या संघाबद्दल विश्वास व्यक्त करत नक्कीच या पदार्पणात लातूर जिल्हा यश संपादन करेल अशी ग्वाही दिली.
राज्य संघटनेच्या या आॕलिंपिक स्पर्धांच्या आयोजन समितीचे उपाध्यक्ष व जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नितीन शेटे यांनी लातूर संघास यावेळी शुभेच्छा दिल्या.