रक्तदान करा आणि स्वतःचा जीव सुरक्षित करा विर योद्धा संघटनेची संकल्पना.
लातूर दि १३ जानेवारी ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. लातूर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आणि काही रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हि गरज लक्षात घेऊन राजमाता जिजाऊ यांच्या ४२५ व्या व स्वामी विवेकानंद यांच्या १६० व्या जयंतीचे औचित्य साधून विर योद्धा संघटनेच्या वतीने आज गुरुवार दि १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद चौक येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन स्वामी विवेकानंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उदय सावंत व व्यकंट मरे यांनी केले. यावेळी उपस्थित ॲडव्हकेट प्रदीपसिंह गंगणेही होते. सदरील शिबिरात दुपारी पाच वाजेपर्यंत ४२५ जणांनी रक्तदान केले आहे. शहरात सध्या थॅलेसेमिया, सिकलसेल, कर्करोग, डेंग्यू रुग्णांकरिता रक्ताची मोठी आवश्यकता असते. यासाठी विर योद्धा संघटनेच्या माध्यमातून शहरातील विविध महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी यांना रक्तदान करण्यास प्रोत्साहन करणारे पत्रक पाठवण्यात आले आहे.

रक्तदान करा आणि स्वतःचा जीव सुरक्षित करा संकल्पना.
रक्तदान करा आणि स्वतःचा जीव सुरक्षित करा अशी ही नाविन्यपूर्ण संकल्पना विर योद्धा संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. शहरातील जास्तीत जास्त सुजान दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन विर योद्धा संघटनेचे प्रमुख श्रीकांत रांजणकर यांच्या वतीने याप्रसंगी करण्यात आले. जी व्यक्ती रक्तदान करणार आहे त्याला त्याच्या गरजेच्यावेळी तात्काळ विर योद्धा संघटना रक्त उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदरील शिबीरात होणारे रक्त संकलन हे शहरातील भालचंद्र ब्लड बँकेकडे होत आहे अशीही माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे राष्ट्रीय सचिव नीलकंठ किल्लारिकर, केंद्रीय सदस्य प्रकाश खानापुरे, सचिन सरवदे तसेच संघटनेचे प्रदेश नायक नितीन दादा मोहनाळे, जिल्हा नायक दयानंद गव्हाणे, जिल्हा संघटक दीपक तांदळे, शहर कार्यनायक पांडुरंग क्षीरसागर तसेच विर योद्धा संघटनेचे शिलेदार संतोष यादव, नुतन हनुमंते रोहित रांजणकर, शंभू उपाडे, कृष्णा पांढरे यांनी प्रयत्न केले.