विभागीय कराटे स्पर्धेत जापनीज शोतोकान च्या खेळाडूंचे घवघवीत यश.
लातूर दि १४ जानेवारी जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडा व युवक सेवा संचलनालय यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी लातूर आयोजित विभागीय कराटे स्पर्धेत जापनीज शोतोकान कराटे खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. दि १२ व १३ जानेवारी या स्पर्धा संपन्न झाल्या असून सन २०२२-२३ सालातील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या खेळाडूंची निवड करण्यात आली असल्याचे क्रीडा अधिकारी श्री मदन गायकवाड यांनी सांगितले. या स्पर्धेचे उद्घाटन स्वामी विवेकानंद पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर, क्रीडा अधिकारी श्री मदन गायकवाड, तालुका क्रीडा अधिकारी श्री सुरेंद्र कराड, क्रीडा मार्गदर्शक श्री चंद्रकांत लोदगेकर यांच्या उपस्थितीत झाला आहे. या स्पर्धेसाठी नांदेड मनपा, ग्रामीण लातूर मनपा, ग्रामीण व उस्मानाबाद च्या १४, १७ व १९ वयोगटातील ६६ वजनी गटात जवळपास दोनशेहुन अधिक मुले व मुलींचा सहभाग होता.

या स्पर्धेत जापनीज शोतोकान कराटे या प्रकाराच्या खेळाडुंचा दबदबा होता असे वर्ल्ड जापनीज शोतोकान कराटे असोसिएशन चे संचालक मास्टर अजमेर शेख यांनी लातूर नेता न्युज शी बोलताना सांगण्यात आले.
या विजयी खेळाडुमधे तन्मय सुधाकर बावकर, प्रगती उद्धव जाधव प्रथम, प्रथमेश राम जाधव प्रथम, रोहन विठ्ठल सूर्यवंशी द्वितीय, हर्ष नामदेव भोसले द्वितीय, आर्यन बब्रुवान सुरवसे द्वितीय, शिवदर्शन मुदगळे द्वितीय, रेश्मा ईश्वर सूर्यवंशी त्रृतीय यांचा सहभाग होता. या विजयी खेळाडूंचे कराटे प्रशिक्षक दत्ता कदम, रवी शिंदे, सुधाकर उळेकर, बाबाजी जायभाय, तुषार अवस्ती यांच्यासह लातूर नेता न्युज नेटवर्क च्या वतिने अभिनंदन करुन शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

विभागीय कराटे स्पर्धेतील विजयी खेळाडु .