तालुकास्तर क्रीडा स्पर्धेत होळीच्या जिल्हा परिषद शाळेची यशस्वी वाटचाल.
लोहारा प्रतिनिधी : तालुक्यातील होळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या तालुकास्तरावरीय विविध क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी होउन कुस्ती, गोळाफेक, धावणे आदी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करुन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या विजयी खेळाडूमधे सुमित पिंटू चव्हाण 48kg कुस्ती गटात प्रथम, हर्ष बळीराम सुरवसे 52kg कुस्ती गटात प्रथम, वैभव नारायण राठोड 56kg कुस्ती गटात प्रथम, सुशांत पांडुरंग गिरी 200 मी. धावणे द्वितीय, गोळा फेकसाठी सुमित पिंटू चव्हाण प्रथम, हर्ष बळीराम सुरवसे द्वितीय सहभागी आहेत.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बजरंग जाधव, उपाध्यक्ष बळीराम सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य केशव सरवदे, मुख्याध्यापक अशोक रोडगे, अरुण जाधव, शिक्षक सौदागर सर, सतीश माळी, वनराज सुर्यवंशी, गणेश वाघमारे, प्रमोद माने, मठपती सर, संजय बिदे आदी उपस्थित होते.
