लातूर विभागीय कराटे स्पर्धेत जापनीज कराटेचा बोलबाला.
लातूर दि १८ जानेवारी क्रीडा व युवक सेवा संचलनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर यांच्या वतिने आयोजित विभागीय कराटे स्पर्धेत जापनीज कराटेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत उत्तुंग यश संपादन केले आहे. यात प्रथम क्रमांकाच्या खेळाडूंची राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली असून खेळाडूंना प्रशिक्षक मास्टर दत्ता कदम यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विजयी प्रथम क्रमांकांच्या खेळाडूंनी सुवर्णपदकासाठी श्रेष्ठा सुधीर सूर्यवंशी, श्रुती शिवळकर, अविनाश जगताप, सचिन बाळू चव्हाण, बालाजी संजय राठोड, रौप्यपदकासाठी आदित्य अश्विनकुमार स्वामी, अनिकेत बजरंग अंधारे, श्रुती अरवाड, ऋषीकेश नितिन बिरादार तर कांस्यपदकासाठी प्रेरणा प्रमोद चव्हाण, इजान शेख, अंकिता घोडके यांनी यश संपादन केले आहे.

या विजयी खेळाडूंचे प्रशिक्षक दत्ता कदम, बालाजी गिरी, सुयश लांडगे, यशवंत मेकाले, मधुरा मेकाले वैभव अंधारे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Very Nice, Thanks Sir