तलवार घेऊन फिरणारा युवक अटकतलवार घेऊन फिरणारा युवक अटक

तलवारीसह घातक शस्त्र घेऊन फिरणाऱ्या युवकाला अटक.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; तलवार व इतर साहित्य जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

लातूर दि १८ जानेवारी पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी अवैध शस्त्रांचे संबंधाने माहिती काढून त्यावर कारवाई करणे बाबत निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पथक तयार करुन अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांच्या विरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येत आहे. याचसंबंधाने माहिती काढत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिनांक 17/01/2023 रोजी गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीत छञपती शिवाजी चौक ते राजीव गांधी चौक जाणारे रोडवर दोघेजण तलवार सारखे घातक शस्त्र घेऊन ते शर्टच्या आतील बाजूस लपवून फिरत आहेत. अशी माहिती मिळाल्याने सदर पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन शर्टच्या आतील बाजूस तलवार लपवून फिरणारा युवक नामे 1) श्रीकांत उर्फ चिलकारी गुराप्पा पवार, वय 20 वर्ष, राहणार शंकरआप्पातोट तालुका कल्याणदुर्ग, जिल्हा अनंतपुर, राज्य आंध्रप्रदेश 2) सोबत एक विधी संघर्ष बालक याला ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे एक लोखंडी तलवार, लोखंडी चाकू, कातर, कानस व एक बॅटरी मिळून आली. सदरचे घातक शस्त्र व बॅटरी, कानस जप्त करण्यात आली असून सदर युवक श्रीकांत उर्फ चिलकारी गुराप्पा पवार याचेवर पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे कलम 4, 25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यास आलेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलीस अमलदार रामहरी भोसले, राजेंद्र टेकाळे, संजय भोसले अंगद कोतवाड, बंटी गायकवाड ,राम गवारे, प्रकाश भोसले, दीनेश देवकते ,प्रमोद तरडे ,नितीन कठारे , राजू मस्के, माधव बिलापट्टे,जमीर शेख यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!