रेल्वे पटरीवरील इसमाचा जिव वाचवणाऱ्या युवकचा सत्कार.
स्वामी विवेकानंद पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम.
लातूर दि २२ जानेवारी स्वामी विवेकानंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एम आय टी मेडिकल काॅलेज जवळ असलेल्या रेल्वे ट्रक वर मारहाण करून जखमी अवस्थेतील एका इसमास किरण घनदु चव्हाण वय १७ रा. भामरी चौक लातूर याने तत्परता दाखवत बाजुला करुन जिव वाचवला त्याबद्दल स्वामी विवेकानंद पोलीस स्टेशन च्या वतिने सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस अधिकारी श्री खंदारे, श्री गळगटे, श्री सावंत श्री ढगे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.