लातूर शिवसेनेच्या वतिने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.
लातूर दि २४ जानेवारी लातूर येथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी महाराजांच्या पुतळ्यास व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी महिला आघाडीच्या माजी जिल्हा संघटिका सौ.मैनाताई साबणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विष्णू साबदे, योगेश आप्पा स्वामी, युवा सेना युवा जिल्हाधिकारी ॲड.राहुल मातोळकर तालुकाप्रमुख बाबुराव शेळके, महिला आघाडी माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष प्रीती कोळी, बँक कर्मचारी सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा व्यापारी आघाडीचे जिल्हा संघटक तसेच मार्गदर्शक सी के मुरळीकर, लातूर शहर विधानसभा प्रमुख एसआर चव्हाण, महानगर प्रमुख विष्णुपंत साठे , महानगर संघटक बालाजी जाधव, शहर प्रमुख सुनील बसपुरे, विधानसभा संघटक माधव कलमुकले, लातूर शहर विधानसभा समन्वयक युवराज वंजारे, उपतालुकाप्रमुख नरसिंग आयलवाड मारुती सावंत, शहर संघटक राजू कतारे, दिलीप भांडेकर, उपशहर प्रमुख राहुल आप्पा रोडे, शंकर गंगणे, विभाग प्रमुख प्रदीप उपासे आदी उपस्थित होते.